Mumbai Rain Update
Mumbai Rain Updateesakal

Mumbai Rain Update: नवी मुंबईत पावसाची ‘दम’धार, रेल्वे सेवेवर परिणाम ; चाकरमान्यांना मनस्ताप

Published on

तुर्भे, ता. १९ (बातमीदार) : जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने दिलेल्या दणक्यानंतर जुलै महिन्यात मात्र विश्रांती घेतली होती. मात्र, पुन्हा एकदा पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली असून दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम असल्याने नवी मुंबईतील काही सखल भागांत पाणी साचले; तर काही ठिकाणी गटारांचे दुर्गंधीयुक्त पाणी अनेकांच्या घरासमोरून वाहत होते.
नवी मुंबई शहरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर धरल्याने अनेक भागात पाणी साचले होते.

शहरातील अनेक भागात पाणी साचल्याने त्याचा परिणाम वाहतुकीवर जाणवत होता. पावसाचा सर्वाधिक फटका हा नवी मुंबईतील झोपडपट्टी परिसराला बसला. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला होता. पावसाच्या पाण्यामुळे वाहनांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहनचालकांची डोकेदुखी वाढवली होती. एमआयडीसीमधील रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली होती. त्यामुळे पालिकेकडून खड्डे बुजवण्याची कामे हाती घेतली होती.

रेल्वे सेवेवर परिणाम
पनवेल येथे ९ वाजून ४० मिनिटांनी सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे बेलापूरच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला होता. त्यामुळे कामासाठी निघालेल्या चाकरमान्यांना फटका बसला; तर तुर्भे रेल्वे स्थानकातील भुयारी मार्गात तर दुर्गंधीयुक्त पाणी साचल्याने नागरिकांना घाण पाण्यातून वाट काढावी लागत होती.

वाहनचालकांना मनस्ताप
दिवसभराच्या पावसामुळे ठाणे-बेलापूर रोडवर सखल भागात पाणी साचले आहे. यंदा पालिकेकडून पंप बसवण्यात आल्यामुळे भुयारी मार्गात पाणी साचण्याच्या घटना घडल्या नाही; तरी ऐरोली सेक्टर पाच येथील चौकात, रबाळे टी जंक्शन, ऐरोली येथील माईंड स्पेसजवळ पाणी साचले होते. तुर्भे येथील ब्रिजखाली, दिघा येथील थॉमसन प्रेसजवळ, मुकुंद कंपनीच्या चौकात, यादव नगरमध्ये पाणी साचल्याने वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.