खारघरमधील पदपथांवर चालणे अवघड

खारघरमधील पदपथांवर चालणे अवघड

Published on

खारघर, ता. २० (बातमीदार) : खारघरमधील उत्सव चौक ते हिरानंदानी दरम्यान असलेल्या पदपथाची दुरवस्था झाली आहे. परिसरात नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. पालिका प्रशासनाने परिसरातील पदपथांची दुरुस्ती करावी, असे पत्र माजी नगरसेविका हर्षदा अमर उपाध्याय यांनी पालिका आयुक्तांना दिले आहे.
खारघर उत्सव चौक ते हिरानंदानी हा मुख्य परिसर आहे. बँक ऑफ इंडिया ते उत्सव चौक परिसरातील रस्त्याच्या कडेला असलेल्या कट्ट्यावर नागरिक सकाळ, संध्याकाळी विसावासाठी येत असतात. याशिवाय बाजूला बालभारती पब्लिक स्कूल, डाकघर आणि सिडकोचे कार्यालय आहे. तसेच, मोबाईल फोनची गॅलरी, विविध बँका, काही अंतरावर पटेल हेरिटेज, हिरानंदानी इमारतीत मोठ्या प्रमाणात दुकाने आहेत. यासाठी नागरिक येथील पदपथांचा उपयोग करत असतात. त्यामुळे परिसरात कायम वर्दळ असते. मात्र, येथील पदपथांची दुरवस्था झाल्याने नागरिकांना चालताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी तर पेव्हर ब्लॉकचे तुकडे झाले आहेत, तर काही गायब आहेत. त्यामुळे नागरिक जीव धोक्यात घालून पदपथाचा वापर करत आहेत. पालिकेने पदपथांची दुरुस्ती करावी, असे पत्र हर्षदा उपाध्याय यांनी पालिका आयुक्त गणेश देशमुख यांना दिले आहे.

खारघर : उत्सव चौक ते हिरानंदानी दरम्यान पदपथांची दुरवस्था झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.