ऐरोलीत भरदिवसा लाखोंची घरफोडी

ऐरोलीत भरदिवसा लाखोंची घरफोडी

Published on

नवी मुंबई, ता.३१(वार्ताहर): ऐरोली सेक्टर-९ डी मधील गणेश अपार्टमेंटमध्ये भरदिवसा घरफोडी करून ३ लाख ६० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरला आहे. या प्रकरणी रबाळे पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.
ऐरोली सेक्टर-९ डी मधील गणेश अपार्टमेंटमध्ये लोकेशकुमार गुप्ता कुटुंबासह राहण्यास आहेत. २८ जुलै रोजी सकाळी लोकेशकुमार व त्यांची पत्नी दोघे कामावर निघुन गेल्याने त्यांचे घर बंद होते. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून त्यांच्या घरातील रोख रक्कमेसह वेगवेगळ्या प्रकारचे सोन्याचे दागिने असा ३ लाख ६० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरुन नेला आहे. लोकेशकुमार कामावरून आपल्या घरी आले असता, त्यांच्या घराचा कडी कोयंडा तुटल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर रबाळे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.