क्लस्टर योजनेसाठी ठाणे महापालिका आणि महाप्रित यांच्यात करार

क्लस्टर योजनेसाठी ठाणे महापालिका आणि महाप्रित यांच्यात करार

Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २ : आशिया खंडातील सर्वात मोठी, महत्त्वाकांक्षी व ऐतिहासिक समूह विकास योजना (क्लस्टर) ठाण्यात मूर्तरूप घेत आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यातील काम किसननगरमध्ये सुरू झाले आहे. त्याच टप्प्यातील टेकडी बंगला, हाजुरी व किसननगर क्लस्टरचा काही भाग विकसित करण्यासाठी ठाणे महापालिकेने बुधवारी महात्मा फुले नूतनीय ऊर्जा व पायाभूत सुविधा तंत्रज्ञान लिमिटेड (महाप्रित) या शासकीय संस्थेसह करार केला. पालिका आणि महाप्रीत या दोन संस्थांमधील सामान्य निर्णायक करारावर महापालिका आयुक्त अभिजीत बांगर आणि महाप्रितचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी यांनी बुधवारी सह्या केल्या. महाप्रीत ही कंपनी गृहनिर्माण क्षेत्रातील परवडणारी घरे, शहरी व प्रादेशिक नियोजन तसेच पायाभूत सुविधा विकास इत्यादी क्षेत्रात कार्यरत आहे. तसेच महाप्रित संस्थेकडे प्रधानमंत्री आवास योजना, आर्थिक दुर्बल घटकांसाठी गृहनिर्माण प्रकल्प अशा अनेक अंतर्गत प्रकल्पाचा अनुभव आहे. त्यामुळे सदर संस्थेमार्फत क्लस्टरच्या अंमलबजावणीस चालना मिळणार आहे. या वेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपसंचालक नगर रचना प्रदीप गोहिल, कार्यकारी अभियंता महेश रावळ, महाप्रित संस्थेचे विजयकुमार पाटील, पुरुषोत्तम जाधव, प्रशांत गेडाम, रवींद्र चव्हाण, सुभाष नागे व सुनील पोटे तसेच ठाणे महापालिकेचे तांत्रिक सल्लागार संजय देशमुख व त्यांचे सहायक सागर पवार उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.