आशीष शेलार यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : भाजपचे आमदार आशीष शेलार यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका अज्ञात व्यक्तीविरोधात वांद्रे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३० ऑगस्टला वांद्रे पोलिस ठाण्यात शेलार यांचे स्वीय सहायक नवनाथ सातपुते यांनी याबाबत तक्रार दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, २८ ऑगस्टला सकाळी नऊ वाजता आमदार आशीष शेलार यांना अज्ञात फोन क्रमांकावरून कर्जाची रक्कम भरण्यासाठी मेसेज आला. तसेच मेसेजमध्ये पैसे दिले असल्यास दुर्लक्ष करा, असे सांगत एक वेबलिंक दिली होती. लिंक ओपन केल्यावर आमदार शेलार यांना आणखी एक मेसेज दिसला की, कर्ज सेटलमेंट करण्यासाठी ७,७०० रुपये द्यावे लागतील. शेलार यांनी कोणतेही कर्ज घेतले नव्हते. दरम्यान, दोन अज्ञात फोन नंबरवरून फोन कॉल आले आणि त्यांनी कर्जाची रक्कम भरण्याची विनंती केली. हा घोटाळा असल्याचे शेलारांच्या लक्षात आले आणि त्यांनी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. आमदार आशीष शेलार याबाबत म्हणाले की, ‘मी कोणतेच कर्ज घेतलेले नाही किंवा कोणाचाही जामीनदार म्हणून काम केलेले नाही. याची पोलिसांनी चौकशी करावी. कारवाई व्हावी, यासाठी मी गुन्हा दाखल केला आहे.’ वांद्रे पोलिस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.