Thane: ठाण्यातील नामंकित हॉटेल्सची तपासणी | Inspection of hotels

Thane: ठाण्यातील नामंकित हॉटेल्सची तपासणी | Inspection of hotels

Inspection of hotels in Thane
Published on

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. २६ : गेल्या काही दिवसांपासून अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) ठाणे शहरातील विविध हॉटेल्स व आस्थापनांची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. या तपासणी मोहिमेत अस्वच्छ वातावरणात अन्नपदार्थ तयार करणाऱ्या हॉटेल्सवर कारवाईची बडगा उगारत व्यवसाय बंदीचे निर्देश दिले आहे.

त्यानंतर आता, एफडीएने शहरातील नामांकित व बड्या हॉटेल्सचीदेखील तपासणी मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती एफडीएचे सहआयुक्त सुरेश देशमुख यांनी दिली. तसेच तपासणीदरम्यान अस्वच्छता, त्रुटी आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारादेखील त्यांनी दिला.


ठाणे शहरातील छोट्या-मोठ्या हॉटेल्स व अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्या हातगाड्या यांच्या अवतीभोवतीच्या परिसरात अनेकदा अस्वच्छता असल्याचे दिसून येते. यामुळे या ठिकाणी अन्नपदार्थ खाणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊन आजारांना आमंत्रण मिळत असते.

अशा आस्थापनांवर अन्न आणि औषध प्रशासनाकडून वेळोवेळी तक्रारीदेखील करण्यात येत असतात. त्यापाठोपाठ आता, अनेक नामांकित हॉटेल्सच्या किचनमध्ये अस्वच्छ वातावरणात अन्नपदार्थ तयार करीत असल्याचे दिसून आढळत आहे.

येथे भिंतींवर जळमटे तसेच माशा, झुरळ, उंदरांचा वावर, ड्रेनेज पाईपमधून पाण्याचा निचरा न होणे अशा अनेक त्रुटी आढळतात. मोठ्या हॉटेल्स आस्थापानांकडून होणाऱ्या या अक्षम्य चुकांमुळे अनेक हॉटेल्सवर व्यवसाय बंदीची कारवाई एफडीएने केली आहे.


नामांकित हॉटेल्सच्या किचनमध्ये आढळून आलेल्या अस्वच्छतेमुळे एफडीएने, मोठ्या व नामांकित हॉटेल्सच्या किचनची व तेथील परिसराची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार येत्या काही दिवसांत बड्या हॉटेल्सचीदेखील तपासणी मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती देशमुख यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.