Mumbai News : मुंबईत उद्धव ठाकरे गटाला आणखी धक्का; 3 माजी नगरसेवक शिंदे गटात

आतापर्यंत ३३ माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला
Another blow to Uddhav Thackeray group in Mumbai 3 former corporators in Shinde group
Another blow to Uddhav Thackeray group in Mumbai 3 former corporators in Shinde groupEsakal
Published on

मुंबई : शिवसेना ठाकरे गटातील तीन माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. आतापर्यंत ३३ माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला असून येत्या काळात आणखी काही माजी नगरसेवकांना गळाला लावत शिंदे गट ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या तीन माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यात जोगेश्वरीतील प्रभाग क्रमांक ७३चे माजी नगरसेवक प्रवीण शिंदे, वर्सोवा विधानसभा क्षेत्रातील माजी नगरसेविका प्रतिमा खोपडे आणि प्रभाग क्रमांक ८८च्या माजी नगरसेविका स्नेहल शिंदे यांचा समावेश आहे.

त्यांच्यासह जोगेश्वरी, वर्सोवा आणि विलेपार्ले विभागातील १००हून अधिक पदाधिकाऱ्यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. या सर्वांचे मुख्यमंत्री शिंदे यांनी पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मुंबईत आतापर्यंत ठाकरे गटाच्या ३३ माजी नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला असून आहे. त्यामुळे ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातो.

Another blow to Uddhav Thackeray group in Mumbai 3 former corporators in Shinde group
Mumbai Ganesh Visarjan 2023 : मुंबईत ठिकठिकाणी विसर्जन मिरवणुकीची धूम; मुंबईत वाहतुकीसाठी 'हे' रस्ते बंद

मराठी माणूस मुंबईत आणणार!
भाजप-शिवसेना सत्तेत आल्यापासून मुंबईत अनेक विकासकामे वेगाने सुरू झाली असून त्यामुळे या शहराला खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय शहर बनवण्याचा प्रयत्न सुरू झाला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुंबईतील रखडलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती देऊन मुंबईतून बाहेर गेलेला मराठी माणूस पुन्हा मुंबईत आणण्याचा प्रयत्न सरकारतर्फे केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.