cold and cough
cold and coughsakal

Navi Mumbai News : नवी मुंबईकर खोकल्याने बेजार

Published on

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १२ ः पावसाळा सरताच नवी मुंबई शहरात खोकल्याची साथ सुरू झाली आहे. अनेक भागांतील रस्त्यांवर वाढलेल्या धुळीमुळे रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. तसेच आठ दिवसांपेक्षा अधिक काळ हा खोकला राहत असल्याने बेजार झालेल्या रुग्णांवर रुग्णालयांची पायरी चढण्याची वेळ आली आहे.
नवी मुंबईची हवा प्रदूषित असल्याची नोंद केंद्रीय हवामान विभागाच्या ‘सफर’ या संकेतस्थळावर झाली आहे. काही दिवसांपासून वातावरणात आमूलाग्र बदल होऊ लागले आहेत. सकाळच्या गारव्यानंतर दुपारी सूर्य आग ओकत असल्याने उष्मा वाढला आहे. पावसाळा गेल्यानंतर आता हळूहळू ऑक्टोबर हिटच्या झळांचा अनुभव येऊ लागला आहे. रात्री नंतर पुन्हा काही भागांत गारवा निर्माण होत आहे. बदलत्या वातावरणामुळे नवी मुंबईत खोकल्याचे रुग्ण वाढल्याचे चित्र आहे. आठवडाभरानंतरही खोकला लवकर बरा होत नसल्याच्या तक्रारी रुग्णांकडून केल्या जात आहेत. त्यामुळे महापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रात बाह्यरुग्ण विभागात तपासण्यासाठी येत असलेल्या रुग्णांपैकी २५ टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण हे व्हायरल आजारांचे असून सीबीडी-बेलापूर, नेरूळ, तुर्भे, कोपरखैरणे, पावणे, महापे आदी भागांत खोकल्याच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद होत आहे.
--------------------------------------
सध्या वातावरण परिवर्तनाचा काळ आहे. ऋतू बदल होऊन हिवाळा सुरू होत आहे. अशा परिस्थितीत जमीन अद्याप थंड झालेली नाही. त्यामुळे रात्रीनंतर वातावरणात गारवा निर्माण होत असल्याने धुरके तयार होत आहेत. त्यामुळे धुक्यातील धुलीकण श्वासावाटे शरीरात गेल्यानंतर अस्थमा अथवा अॅलर्जीसारखा रुग्णांना खोकल्याचा त्रास होत आहे.
- डॉ. प्रशांत जवादे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, नवी मुंबई महापालिका
-----------------------------
खोकल्याचे विविध प्रकार आहेत, ज्यामध्ये कफसह ओला खोकला, कोरडा खोकला, तीव्र खोकला, क्रोनिक खोकला आणि रीफ्रॅक्टरी खोकला असतो. सर्दी वर्षभरात कधीही होऊ शकते. वातावरणीय बदल, विशेषत: तापमान व आर्द्रतेमधील बदल आणि हवेशी संपर्क यामुळे हे आजार होण्‍याची शक्‍यता वाढते.
़ः - डॉ. ओरपा कालेल, सल्लागार-ईएनटी, फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटल, वाशी
-----------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.