लोकमान्य टिळक मार्गावरील स्कायवॉकची पुनर्बांधणी

लोकमान्य टिळक मार्गावरील स्कायवॉकची पुनर्बांधणी

Published on

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ ः दहिसर पश्चिम येथील लोकमान्य टिळक मार्गावर स्कायवॉक धोकादायक ठरल्याने तो बंद करण्यात आला होता. त्यामुळे स्थानिकांची गैरसोय होत होती. आता या स्कायवॉकची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यासाठी पालिकेने ३० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

२०१० मध्ये हा स्कायवॉक एमएमआरडीएने बांधला होता. एमएमआरडीएने २०१५ मध्ये तो मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित केला होता. २०१६ मध्ये या स्कायवॉकचा काही भाग कोसळला. त्यानंतर तो रहदारीसाठी बंद करण्यात आला होता. व्हीजेआयटी यांच्यामार्फत स्कायवॉकचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. त्यात जीर्ण झालेला स्लॅब काढून दुरुस्ती करण्यास सुचवले होते. एस. एस. जी कन्सल्टंट सर्व्हिसेस यांनी तपासणी करून गेल्या वर्षी अहवालही सादर केला होता. जीर्ण अवस्थेतील बांधकाम पाडून त्यांनी पुनर्बांधणीची शिफासर केले होती. स्वस्तिक कन्स्ट्रक्शन यांना हे काम देण्यात आले होते.

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनीही या स्कायवॉकच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. शिवसेना आमदार विलास पोतनीस, स्थानिक नगरसेविका शीतल म्हात्रे यांच्यासह रहिवाशांनी तत्कालिन पालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेऊन स्कायवॉक पुनर्बांधणीची मागणी केली होती. आता स्कायवॉकचा प्रस्ताव मंजूर झाला असून लवकरच कामाची सुरुवात करण्यात येणार आहे. स्कायवॉकचे काम पूर्ण करण्यासाठी पावसाळा धरून १५ महिने इतका कंत्राट कालावधी ठरवण्यात आला आहे. स्कायवॉकची लांबी ८५० मीटर असून पुलाची रुंदी ४ मीटर आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com