अपोलो कॅन्सर सेंटर मध्ये कर्करोग जागरूगता महिन्या निमित्त अचूक स्तन कर्करोग निदान कार्यक्रम संपन्न

अपोलो कॅन्सर सेंटर मध्ये कर्करोग जागरूगता महिन्या निमित्त अचूक स्तन कर्करोग निदान कार्यक्रम संपन्न

Published on

पनवेल, ता. २ (बातमीदार) : महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग होण्याचे प्रमाण वाढत आहे. कर्करोग झालेल्या रुग्णांमध्ये १४ ते १८ टक्के रुग्ण हे स्तनाचे असतात. वेळीच निदान होऊन योग्य उपचार घेतल्यास हा कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो, असे मार्गदर्शन नुकतेच नवी मुंबई अपोलो कॅन्सर सेंटर नेरूळ येथे झालेल्या स्तन कर्करोग निदान मार्गदर्शन शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांनी केले.
नवी मुंबई, अपोलो कॅन्सर सेंटर्स ‘इंडियाज फास्टेस्ट आणि मोस्ट प्रिसाइज ब्रेस्ट कॅन्सर डायग्नोसिस प्रोग्रॅम’ने भारतातील सर्वात जलद आणि अचूक स्तन कर्करोग निदान कार्यक्रम सुरू करून कर्करोगावरील प्रगत उपचारांच्या कक्षा रुंदावल्या आहेत. स्तनाच्या जनजागृती निर्माण व्हावी व महिलांनी याबाबत सजग व्हावे, यासाठी ऑक्टोबर महिना स्तन कर्करोग जागरूकता महिना म्हणून साजरा केला जातो. ऑक्टोबरमधील स्तन कर्करोग जागरूकता महिन्याच्या अनुषंगाने अपोलो कर्करोग केंद्रे हा कार्यक्रम महिलांत स्तनाच्या कर्करोगाचे वेळेवर निदान करण्यासाठी समर्पित केला आहे. या कार्यक्रमाला वरिष्ठ सल्लागार आणि ऑन्कोलॉजी संचालक डॉ. अनिल डिक्रूझ, ब्रेस्ट सर्जरी प्रमुख सल्लागार डॉ. नीता नायर, मेडिकल ऑन्कोलॉजीच्या वरिष्ठ सल्लागार डॉ. तेजिंदर सिंग, रेडिओलॉजी सल्लागार डॉ. अनीता बजाज, डॉ. वीणा वानेरे, सल्लागार, हिस्टोपॅथॉलॉजी आणि संतोष मराठे, पश्चिम क्षेत्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अपोलो हॉस्पिटल उपस्थित होते.
----
देशात २१ महिलांमागे एका महिलेला धोका
महिला उघडपणे चर्चा करणे टाळत असल्याचे डॉक्टरांचे महणणे असून साधारण ३५ ते ६५ वर्षे वयोगटांतील महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग आढळून येतो. मात्र, काही वर्षांत कमी वयातील महिलांतही हे प्रमाण वाढत आहे, याबाबत तज्ज्ञांनी चिंता व्‍यक्त केली.
------
फोटोओळ
कर्करोग जागरूकता महिन्यानिमित्त अचूक स्तन कर्करोग निदान कार्यक्रमात अपोलो कॅन्सर सेंटरमध्ये मार्गदर्शन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.