Palghar Loksabha Voter: पाच वर्षांत सव्वा लाख मतदारांची वाढ, वगळल्या गेलेल्या मतदारांची देखील संख्या मोठी

Palghar Loksabha Voter: पाच वर्षांत सव्वा लाख मतदारांची वाढ, वगळल्या गेलेल्या मतदारांची देखील संख्या मोठी

Published on

पालघर, ता. ८ (बातमीदार) : पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघातील मतदारांची संख्या २० लाख ७८ हजार ९२३ वर पोहोचली आहे. मागील पाच वर्षांत एक लाख २७ हजार २५५ मतदारांची वाढ नोंदवण्यात आली आहे. २७ ऑक्टोबर २०२३ पर्यंत सर्वाधिक वाढ बोईसर मतदारसंघात झाली असून सर्वात कमी नोंद पालघर मतदारसंघात नोंदवण्यात आली.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी पुरुष मतदार १० लाख २५ हजार २७०, स्त्रिया नऊ लाख २५ हजार ८३१ आणि तृतीयपंथी ११७ मिळून १९ लाख ५१ हजार ६६८ मतदार होते. २७ ऑक्टोबर २०२३ पर्यंत हा आकडा २०,७८,९२३ वर पोहोचला आहे. याचा अर्थ गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत पालघर लोकसभा मतदारसंघात एक लाख २७ हजार २५५ मतदारांची वाढ झाली.

या दरम्यान एक लाखाहून अधिक मतदारांची नावे वगळली गेली असून त्यामध्ये मयत झालेले व दुबार नोंदणी केलेल्या मतदारांचा समावेश असल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली.

बोईसर विधानसभा मतदारसंघात ४८ हजार २४९, तर विक्रमगड मतदारसंघात ३५,१२६, वसई मतदारसंघात १९ हजार २७०, डहाणू मतदारसंघात नऊ हजार ८३४, नालासोपारा मतदारसंघात नऊ हजार ५८३ व पालघर विधानसभा मतदारसंघात पाच हजार १९३ वाढ झाली, असे सांगण्यात आले.

पालघर लोकसभा मतदारसंघातील मतदार
विधानसभा मतदारसंघ मतदार
नालासोपारा ५,२८,६५६
बोईसर ३,६३,६४९
वसई ३,२३,९४४
विक्रमगड ३,०१,५७५
डहाणू २,८१,९०३
पालघर २,१९,१८७

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()