navale bridge
navale bridgeEsakal

Maharashtra Accidents: अपघाती मृत्यूदरात महाराष्ट्र तिसरा, चार वर्षांच्या तुलनेत २०२२ मध्ये ८.१ टक्के वाढ

Published on

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ ः देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवर सर्वाधिक अपघात आणि मृत्यू होत असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने घोषित केलेल्या २०२२ च्या अहवालातून स्पष्ट होत आहे. ज्यामध्ये सर्वाधिक रस्ते वाहन अपघात राष्ट्रीय महामार्गांवर झाले असल्याची नोंद करण्यात आली आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र अपघातासाठी सहाव्या; तर अपघाती मृत्यूसाठी तिसऱ्या क्रमांकावर आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने आपल्या अहवालात अपघात आणि मृत्यूच्या वाढत्या संख्येचे वर्गीकरण केले आहे. ज्यामध्ये सर्वाधिक संख्‍या असलेल्‍या देशातील १० राज्‍यांना निवडण्यात आले आहे. ज्यामध्ये सर्वाधिक अपघात तमिळनाडूमध्ये झाले आहे. त्यानंतर केरळ, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि त्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो आहे.

धक्कादायक म्हणजे २०१८ नंतर पहिल्यांदा २०२२ मध्ये अपघातात ६.२ टक्के वाढ झाली असून, ९ हजार ४१७ अपघात झाले असल्याचे या अहवालात नमुद करण्यात आले आहे; तर वाहन अपघातामध्ये ४ हजार ९२३ मृत्यू झाले असून, गेल्या वर्षांच्या तुलनेत मृत्युदरात ८.१ टक्‍के वाढ झाली असल्याने महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गावरील रस्ते वाहन अपघात चिंतेचा विषय ठरला आहे.

सर्वाधिक अपघात
राज्य - २०१८ - २०१९- २०२०- २०२१ - २०२१ - टक्केवारी
तमिळनाडू - २२,९६१ - २१,४८९ - १८,३७२ - १६,८६९ - १८,९७२ - १२.५ टक्के
केरळ - ९,१६१ - ९,४५९ - ६,५९४ - ८,०४८ - १७,६२७ - ११.६ टक्के
उत्तर प्रदेश - १६,१९८ - १६,१८१ - १३,६९५ - १४,५४० - १४,९९० - ९.९ टक्के
मध्य प्रदेश - ९,९६७ - १०,४४० - ९,८६६ - ११,०३० - १३,८६० - ९.१ टक्के
कर्नाटक - १३,६३८ - १,३३६३ - ११,२३० - ११,४६२ - १३,३८४ - ८.८ टक्के
महाराष्ट्र - ९,३५५ - ८,३६० - ६,५०१ - ७,५०१ - ९,४१७ - ६.२ टक्के

सर्वाधिक मृत्‍यू
राज्य - २०१८ - २०१९- २०२०- २०२१ - २०२१ - टक्केवारी
उत्तर प्रदेश - ८,८१८ - ८,८३० - ७,८५९ - ८,५०६ - ८,४७९ - १३.९ टक्के
तामीळनाडू - ६,७५६ - ६,६६१ - ५,४५४ - ५,२६३ - ५,९७८ - ९.८ टक्के
महाराष्ट्र - ४,०८८ - ३,७०९ - ३,५२८ - ४,०८० - ४,९२३ - ८.१ टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.