Maratha Reservation
Maratha Reservationesakal

Maratha Reservation: बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही आरक्षण मर्यादा वाढवा: माजी मुख्यमंत्र्यांनी केली मागणी!

Published on

Maratha Reservation: बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही आरक्षणाची मर्यादा वाढवण्यात यावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. बिहार विधानसभेने आरक्षणाची मर्यादा ७५ टक्के करण्याबाबतचे विधेयक काल (ता. ९) मंजूर केले. याबाबत प्रतिक्रिया देताना त्यांनी ही मागणी केली.

Maratha Reservation
Maratha Reservation : आरक्षणाच्या विषयात टोकाचे बोलणे टाळावे - वळसे पाटील

चव्‍हाण म्हणाले की, जे बिहारमध्ये शक्य आहे ते महाराष्ट्रात का नाही? राज्य विधिमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनात महायुती सरकारने महाराष्ट्रातही आरक्षण मर्यादा शिथिल करण्याबाबत पावले उचलावीत. जेणेकरून मराठा आरक्षणाचा मार्ग सुकर होऊ शकेल.

Maratha Reservation
Maratha Reservation: "२४ डिसेंबरच्या आत मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे, लवकर टाईम बॉन्ड द्यावा"; मनोज जरांगे काय म्हणाले?

बिहारच्या या विधेयकाला तेथील भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी पाठिंबा दिल्याचेही अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. देशात जातिनिहाय जनगणना करावी आणि आरक्षणाची मर्यादा शिथिल करावी, ही भूमिका काँग्रेस पक्षाने अगोदरच स्वीकारली आहे.

हैदराबाद व नवी दिल्ली येथे झालेल्या काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत तसे ठरावही मंजूर करण्यात आले आहेत. याकडे लक्ष वेधून राज्य सरकारने याबाबत पुढाकार घ्यावा, अशी मागणी चव्हाण यांनी केली.

Maratha Reservation
Maratha Reservation: पूर्व विभागात 1 हजार 807 कुणबी, 1 मराठा कुणबी नोंद! 3 दिवसात 1 लाखाहून अधिक नोंदींची तपासणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()