Palghar News: लाभार्थ्यांपर्यंत सरकार पोहोचल्यासच देश विकसित होणार,भारत संकल्पना यात्रेचा शुभारंभ
पालघर, ता. १५ (बातमीदार) : प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत सरकार पोहोचेल, तेव्हाच हा देश विकसित भारत म्हणून खऱ्या अर्थाने ओळखला जाईल. त्यासाठी केंद्रातील मोदी सरकार व राज्य सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत, असे प्रतिपादन पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले. पालघर तालुक्यातील धनसार येथे जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणावर आयोजित कार्यक्रमात विकसित भारत संकल्पना यात्रेचा शुभारंभ बुधवारी (ता. १५) करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. पालघर जिल्ह्यातील या यात्रेच्या रथाला त्यांनी हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला.
पालघर जिल्ह्यात आज (ता. १५) बिरसा मुंडा यांची जयंती साजरी होत असल्याचा आनंद होत आहे. जनजाती समाजाच्या गरजा जाणून घेऊन त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रत्येक वंचित घटकाला सरकारी योजनेचा लाभ देऊन त्यांना दिलासा देण्याचे काम हे सरकार करत आहे व पुढेही त्यांना लाभ देण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे व राहील, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिली. पंतप्रधान मोदी व केंद्र सरकारने भारतातील जनतेला प्रथम महत्त्व दिले असून त्यांच्या विकासासाठी हे सरकार कटिबद्ध असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
या वेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, उपाध्यक्ष पंकज कोरे, सरपंच राखी पाटील, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, उपजिल्हाधिकारी योगेश चव्हाण, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रवीण भावसार, गटविकास अधिकारी नरेंद्र रेवंडकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सागर पाटील, तसेच सरकारी योजनांचे लाभार्थी आदी उपस्थित होते.
‘कोरोना लशीचे आव्हान पेलले’
कोरोना महामारीमध्ये मोठमोठ्या देशांसमोर लस निर्माण करण्याचे आव्हान होते. मात्र भारताने स्वतःच्या देशात लस तयार करून ती अन्य देशांमध्ये पाठवली, हे आपल्या देशाचे मोठेपण आहे व यश आहे. तसेच भारतालगतचे देश त्या वेळी अन्नासाठी वणवण फिरत असताना पंतप्रधान मोदी यांनी प्रत्येक गरजवंताला अन्न पोहोचवण्याची जबाबदारी खांद्यावर पेलत ती यशस्वीपणे पार पाडली, असा हा आपला भारत देश असल्याचे सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.