Thane: महापालिकेच्या ताफ्यात आखणी १०० ई बस ; प्रवास होणार सुखकर

Thane: महापालिकेच्या ताफ्यात आखणी १०० ई बस ; प्रवास होणार सुखकर

Published on

ठाणेकरांच्या सुखद प्रवासासाठी ठाणे पालिकेचा परिवहन विभाग सरसावला आहे. परिवहन सेवेच्या ताफ्यात पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बस दाखल करीत प्रवाशांना जास्तीत जास्त सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशातच दुसरीकडे पीएम ई बस योजनेच्या पहिल्या टप्प्यात ठाणे शहराचा समावेश झाल्याने नव्या वर्षात फेब्रुवारी महिनाअखरेपर्यंत टीएमटीच्या ताफ्यात १०० नवीन इलेक्ट्रिक वातानुकूलित बस दाखल होणार आहेत.

ठाणे शहरातील झपाट्याने होणारा विस्तार, त्याचबरोबर नागरीकरण, यामुळे शहराच्या लोकसंख्येत वाढ होत आहे. ठाणेकरांसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या टीएमटी प्रशासनाच्या ताफ्यात असलेल्या अपुऱ्या, नादुरुस्त आणि जुन्या बसगाड्यांमुळे नेहमी नागरिकांकडून टीका करण्यात येत असते.

 Thane: महापालिकेच्या ताफ्यात आखणी १०० ई बस ; प्रवास होणार सुखकर
Sharad Pawar यांची Thane मधील 'ती' भेट Eknath Shinde यांच्यासोबत Ajit Pawar यांना भारी पडणार?

अशातच ठाणेकरांचा प्रवास सुखकर आणि पर्यावरणस्नेही व्हावा, यासाठी महापालिका प्रशासनाने प्रदूषणविरहित अशा इलेक्ट्रिक बस घेण्याचा निर्णय घेतला. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा उपक्रमांतर्गत इलेक्ट्रिक बस टप्प्याटप्प्याने खरेदी करण्यात येत आहेत. त्यानुसार यापूर्वी या उपक्रमांतर्गत १२३ पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बसगाड्या खरेदी करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ८० बसगाड्या दाखल झाल्या असून या बसगाड्या प्रवासी सुविधेसाठी उपलब्ध होत आहेत. उर्वरित ४३ बसगाड्या येत्या काही दिवसांत दाखल होणार आहेत. त्यापाठोपाठ आता पीएम ई बस योजनेच्या पहिल्या टप्प्यात ठाणे शहराचा समावेश करण्यात आला असून यामुळे नव्या वर्षात फेब्रुवारी महिनाअखरेपर्यंत टीएमटीच्या ताफ्यात शंभर नवीन विद्युत वातानुकूलित बसगाड्या दाखल होणार आहेत, अशी माहिती पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली.

 Thane: महापालिकेच्या ताफ्यात आखणी १०० ई बस ; प्रवास होणार सुखकर
Sharad Pawar यांची Thane मधील 'ती' भेट Eknath Shinde यांच्यासोबत Ajit Pawar यांना भारी पडणार?

ठाणेकरांचा प्रवास सुखकर
केंद्र शासनाकडून पीएम ई-बस सेवा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत तीन लाख आणि त्याहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर दहा हजार विद्युत बसगाड्या देशातील १६९ शहरांमध्ये चालविण्यात येणार आहेत. या योजनेच्या पहिल्या टप्प्यासाठी शहरांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये ठाणे शहराचा समावेश आहे. यामुळे ठाणेकरांचा प्रवास सुखकर होण्याची चिन्हे आहेत.

 Thane: महापालिकेच्या ताफ्यात आखणी १०० ई बस ; प्रवास होणार सुखकर
Koyna Dam : मोठा दिलासा! कोयना धरण आलं भरत, धरणात 'इतका' TMC पाणीसाठा तर महाबळेश्वरला 110 मिलिमीटर पाऊस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.