Uran: उरणमध्ये दोन दिवस पाणीकपात
Uran: औद्योगिकरणामुळे वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे असलेला पाणीसाठा जुलैपर्यंत पुरण्यासाठी उरण तालुक्यात आठवड्यातून दोन दिवस पाणी कपात केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने केले आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या रानसई धरणातून उरण नगरपालिका, तालुक्यातील २१ गावे आणि एनएडी, ओएनजीसी, जीटीपीएस् या प्रकल्पांना पाणीपुरवठा केला जातो. रानसई धरणाची उंची ही १२० फूट असली तरी धरणाच्या पाण्याची पातळी ही ११६.५ फुटांवर आहे. यंदा धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. मात्र, तालुक्यातील वाढत्या औद्योगिकीकरणाबरोबर झालेल्या नागरीकरणामुळे भविष्यातील पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्याची गरज आहे.
अशातच सद्यस्थितीत उरण शहराला दिवसभरात ४० एमएलडी पाणीपुरवठा करावा लागत आहे. त्यामुळे एमआयडीसी सिडकोच्या हेटवणे पाणीपुरवठा योजनेतून ४ एमएलडी पाणी घेत आहे. मात्र, भविष्यात पाण्याची गरज लक्षात घेता आतापासून नियोजन करण्याची गरज आहे. त्यामुळे आठवड्यातून मंगळवार आणि शुक्रवार अशी दोन दिवस पाणीकपात केली जाणार आहे.
उरण तालुक्याच्या लोकसंख्येत वाढ झाली आहे. त्या अनुषंगाने भविष्यात आणखी स्वतंत्र धरणाची आवश्यकता भासणार आहे. तसेच असलेला पाणीसाठा जूनपर्यंत शिल्लक राहावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- व्ही. पाचपुंड, उप-अभियंता, एमआयडीसी
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.