गुजरात सीएनजीविरुद्धच्या आंदोलनाला यश
विरार, ता. १ (बातमीदार) : ऑटोरिक्षा, टॅक्सी चालक-मालक महासंघाद्वारे रिक्षाचालकांच्या विविध मागण्यांसाठी ‘गुजरात सीएनजी गॅस हटवा, महानगर गॅस आणा’चा नारा देत मुंबई-अहमदाबाद महामार्ग रोखण्याचा इशारा देण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (ता. ३०) सकाळी वसई फाट्याजवळील पेल्हार पंप येथे महामार्ग रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्या वेळी गुजरात सीएनजी गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत मीटिंग आयोजित करण्याचे पत्र महासंघाच्या प्रतिनिधींना नायब तहसीलदार नाचण यांच्याद्वारे पाठवल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत येत्या आठ दिवसांत चार सीएनजी पंप २४ तास सुरू करण्याची तयारी गुजरात गॅस कंपनीने दाखवल्याने हे आंदोलनाचे यश असल्याचे मानले जात आहे.
अप्पर जिल्हाधिकारी यांच्या दालनात महासंघाच्या प्रतिनिधींबरोबर सकारात्मक चर्चा पार पडली. या चर्चेमध्ये अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब पंडागळे, जिल्हा पुरवठा अधिकारी पोपटराव ओमासे, महसूल सहायक सुहास माडेकर, गुजरात गॅस कंपनीचे प्रतिनिधी विपुल रांधेरीया, सुमित सौरभ, ऑटोरिक्षा टॅक्सी चालक महासंघाचे अध्यक्ष महेश कदम, विजय खेतले, सल्लागार रघुनाथ कळभाटे, कार्याध्यक्ष बाबुराव राजभर, विजयकुमार मिश्रा, अरविंद पाटील, चंद्रकांत भोईर, मुन्ना शेख, सरचिटणीस शरद जळगावकर, खजिनदार मधुसून राणे, पुतळाजी कदम, रमाशंकर यादव, सुधाकर इंगळे, मच्छिंद्र चव्हाण आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.