व्यसनमुक्ती दिंडीची २० वर्षे
सकाळ वृत्तसेवा
सकाळ, ता. २ : ‘वाट चालावी चालावी पंढरीची’ हे शब्द कायम कार्तिक आणि आषाढी एकादशीला कानी पडत असतात. लाखो भाविक पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी मैलो न् मैल चालत असतात. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात असलेले कासू गाव तसे छोटसे; पण साईभक्तांचे. २० वर्षांपासून डिसेंबर महिन्यात कासू ते शिर्डी अशी दिंडी निघत असते. यंदा व्यसनमुक्तीचा संदेश देणाऱ्या या दिंडीचे रविवारी (ता. ३) प्रस्थान होणार आहे.
पहिल्या दिवशी गावाबाहेर असणाऱ्या बाळाजी नंदाजी देवळात आरती करून ही दिंडी सुरू होते. कासू गावातून गल्ल्या-गल्ल्यांतून जाणाऱ्या पालखी सोहळ्यात टाळ मृदंग ढोल-ताशामध्ये रममाण होत लहान व थोर सहभागी होतात आणि पालखीचे स्वागत जल्लोषात करतात. दिंडीतील व्यसनमुक्ती हा मुख्य उद्देश असतो. शेवटच्या दिवशी व्यसनापासून मुक्त झालेल्या भक्तांचे शाल, श्रीफळ देऊन कौतुक केले जाते. हीच दिंडी अध्यक्ष प्रदीप तांडेल यांच्यासह सर्व ग्रामस्थ कासू गावातून रविवारी निघणार आहे.
***
दिंडीतील शिस्त पाहून मी खरंच अवाक झालो होतो. तंटा नाही, वाद नाही फक्त आणि फक्त साईचे भजन, कीर्तन आणि गजर. पहाटे चार वाजता सर्व साईभक्त उठतात. त्यानंतर स्नानासाठी गरम पाणी मिळावे, यासाठी चूल पेटवतात. मग चहा, आरती होते आणि पालखीचे प्रस्थान होते. तास-दोन तासाने नाश्ता आणि चहा पुढे साधारण १२ ते एक दरम्यान चालणे थांबवतात. त्यात एखादा डॉक्टर, नर्स असतो, जो सर्वांना औषधे पुरवतो. संध्याकाळी पुन्हा आरती होते.
- नीलेश काठे, किहीम, अलिबाग
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.