कॉक्लीयर इम्प्लांटच्या मुलांसाठी ख्रिसमस पार्टी

कॉक्लीयर इम्प्लांटच्या मुलांसाठी ख्रिसमस पार्टी

Published on

डॉक्टरांनी आणले मुलांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : श्रवणदोष असणाऱ्या मुलांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण यावेत यासाठी लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी पुढाकार घेतला. ‘ख्रिसमस डे’च्या निमित्ताने कॉक्लियर इम्प्लांट संदर्भात जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळेस ३० ते ४० मुले सहभागी झाले होते. या कार्यक्रमात बॉलिवूड दिग्दर्शक सुभाष घई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
विशेष कार्यक्रमात बाहुल्यांचे खेळ, जादूचे प्रयोग, बबल डिस्प्ले, नृत्य आणि फोटोग्राफी संबंधीत सत्रे आणि त्यानंतर अल्पोपाहाराचे आयोजन करण्यात आले. पोस्ट-कॉक्लियर इम्प्लांट केअर या विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी १५ मिनिटांचे चर्चा सत्र ही आयोजित करण्यात आले होते. लीलावती रुग्णालयातील कान-नाक-घसा सर्जन डॉ.क्रिस्टोफर डीसूझा म्हणाले की, ‘दरवर्षी २५ हजार बालके बहिरेपणाने जन्माला येतात. श्रवणशक्ती कमी झाल्याने लहान मुलाच्या सर्वांगीण आरोग्यावर हानिकारक परिणाम होतात. हे भावनिक आणि सामाजिक आव्हानांचे एक जटिल जाळे तयार करू शकते. रुग्णालयाने कर्णबधिर किंवा श्रवणशक्ती कमी असलेल्या मुलांना कॉक्लीअर इम्प्लांट प्रदान करण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे. ईएनटी शल्यचिकित्सक, ऑडिओलॉजिस्ट, न्यूरोलॉजिस्ट, बालरोगतज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते यांचा समावेश करण्यात आला आहे. सवलतीच्या दरात उपचार केले जात आहेत. ५०० हून अधिक कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया झाल्या आहेत.

काय येतात आव्हाने
श्रवणदोषामुळे विकासाची आव्हाने, भावनिक समस्या, आत्मविश्वासासंबंधी संघर्ष आयुष्यभरासाठी करावा लागू शकतो. चिंता, नैराश्य आणि शैक्षणिक प्रगतीवर दुष्परिणाम होऊ शकतो.

मानवाच्‍या पाच मूलभूत संवेदना आहेत. या पैकी श्रवण या संवेदनाला काही मुले वंचित राहतात. अशा वेळी पालकांची जबाबदारी असते की, त्‍यांनी मुलांवर दया दाखवू नये. मुलांच्‍या संघर्षमय प्रवासात त्यांना प्रेरणा द्यावी. प्रत्येक गोष्टीवर इलाज आहे. त्यांना आंतरिक शक्ती प्रदान केली पाहिजे. मुलाला जे करायचे आहे ते करण्यासाठी प्रेम आणि स्वातंत्र्य द्या.
– सुभाष घई, दिग्दर्शक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.