वाहनांच्या धडकेत चौकाचा कोपरा ढासाळला
कांदिवली, ता. १३ (बातमीदार) : कांदिवली पूर्वेला आकुर्ली या मुख्य मार्गांवर दृतगती मार्गाहून कांदिवली स्टेशनकडे जाणाऱ्या जोड मार्गांवरील सुशोभीकरण करण्यात आलेल्या चौकाचा कोपरा वाहनांच्या धडकेत ढासळला आहे. वाहतुकीच्या मार्गांवर याचा काही भाग पडला असल्यामुळे आठवड्यापासून वाहनचालकांसह प्रवाशांची डोकेदुखी वाढली असून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कांदिवली पूर्व स्टेशनकडून द्रुतगती मार्ग आणि पूर्वेला इतर विभागांत जाण्यासाठी आकुर्ली हा मुख्य मार्ग आहे. हा मार्ग द्रुतगती मार्गाच्या खालून लोखंडवाला, हनुमाननगर आणि म्हाडा वसाहतीकडे जातो. द्रुतगती मार्गाच्या अलीकडे द्रुतगती मार्गाकडून कांदिवली पूर्व स्टेशनकडे येणाऱ्या आकुर्ली मार्गाच्या जोडमार्गावर मुंबई सुशोभीकरण प्रकल्पांतर्गत लाखो रुपये खर्च करून पालिकेने चौक उभारला आहे. चौकात पृथ्वीची प्रतिकृती साकारलेली आहे. चौकाला तिन्ही बाजूंनी विद्युत रोषणाई केली आहे. मात्र, वाहनांच्या धडकेत चौकाचा कोपरा ढासाळला आहे. विद्युत रोषणाईची पट्टी तुटली आहे. ढासळलेला भाग रस्त्यावर पडून विटा, सिमेंटचे तुकडे विखुरले आहेत. सातत्याने वाहतूक असलेल्या मार्गांवर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यापूर्वीही येथे भाग पडला होता. पालिकेने चौकाची दुरुस्ती केली होती.
-------------
पालिकेने तातडीने डागडुजी करावी आणि शक्य झाल्यास चौकाचा कोपरा कमी करून बाजूने लोखंडी गार्ड बसवावे.
जेणेकरून वारंवार नुकसान होणार नाही. चौकाची शोभा टिकून राहील.
- अरविंद ढेरंगे, सामाजिक कार्यकर्ते
-------
द्रुतगतीहून येणारी वाहने कमी अंतरासाठी विरुद्ध बाजूने वळण घेऊन पुढे जाताना चौकाच्या कोपऱ्याला धडक बसते. लवकरच डागडुजी केली जाईल.
- समीर सानप, दुय्यम अभियंता
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.