रोटरी क्लब ऑफ कल्याणच्या वतीने व्यसनमुक्तीसाठी धाव

रोटरी क्लब ऑफ कल्याणच्या वतीने व्यसनमुक्तीसाठी धाव

Published on

कल्याण, ता. २१ (वार्ताहर) : दरवर्षीप्रमाणे या वर्षीही रोटरी क्लब ऑफ कल्याणतर्फे ‘रोटरी रन’चे आयोजन रविवारी (ता. २४) सकाळी साडेपाच वाजता करण्यात आले आहे. या वर्षी ‘रोटरी रन’चे सहावे वर्ष असून ‘व्यसनमुक्तीसाठी धाव’ या उद्देसासाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे. १०, ५ व ३ किलोमीटर या तीन गटात स्पर्धा होणार आहे. कल्याण पश्‍मिमेतील वसंत व्हॅली येथून या मॅरेथॉनला सुरुवात होणार असून डी मार्ट, निक्की नगर, अग्रवाल कॉलेज, गांधारी रोड, नवीन रिंग रोडमार्गे पुन्हा वसंत व्हॅली येथे या रनचा समारोप होणार आहे.
शांतता आणि संघर्ष प्रतिबंध निराकरण, रोग प्रतिबंध आणि उपचार, पाणी आणि स्वच्छता, माता आणि बाल आरोग्य, मूलभूत शिक्षण आणि साक्षरता, आर्थिक आणि समुदाय विकास, पर्यावरण या विविध क्षेत्रांत काम करून समाजाच्या भल्यासाठी काम करणे हा या वर्षीच्या डी. बी. रोटरी रनचा मुख्य उद्देश आहे. रोटरीचे जिल्हा प्रांतपाल मिलिंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली डी. बी. ग्रुपचे मच्छिंद्र जाधव यांच्या सहकार्याने रोटरी क्लब ऑफ कल्याणचे अध्यक्ष राम मराठे आणि त्यांचे सहकारी या मॅरेथॉनचे नियोजन करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.