Eknath Shinde
Eknath ShindeEsakal

Thane News: क्लस्टरचा आणखी एक नारळ फुटणार

Published on

Thane News: क्लस्टर योजनेतील तिसऱ्या भूखंडावरील कामाचा नारळ शनिवारी (ता. ३०) फुटणार आहे. वागळे इस्टेट येथील रबर इंडियाचा भूखंड ताब्यात घेण्यात आला असून येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते समूह पुनर्विकासाच्या कामाचे भूमिपूजन केले जाणार आहे. त्यामुळे क्लस्टर योजनेला खऱ्या‍ अर्थाने गती मिळणार आहे.(eknath shind)


धोकादायक इमारतींमध्ये जीव मुठीत घेऊन राहणाऱ्या ठाणेकरांना हक्काचे पक्के घर मिळावे, यासाठी आशिया खंडातील सर्वात मोठी सामूहिक पुनर्विकास अर्थात क्लस्टर योजनेच्या पायाभरणीला ठाण्यात सुरुवात झाली आहे. किसननगर येथून या योजनेचा शुभारंभ झाला. त्या वेळी परिसरातील इतर भूखंड ताब्यात घेऊन लवकरच या योजनेचा विस्तार केला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते.(thane cluster)

Eknath Shinde
Raj Thackeray-Eknath Shinde यांची भेट ते Pune Vasant More vs Sainath Babar, MNS मध्ये चाललंय काय?

त्यानुसार दोन महिन्यांपूर्वी या योजनेतील किसननगर येथील तब्बल सहा एकर जमीन ठाणे महापालिकेच्या ताब्यात आली. या भूखंडामध्ये बुश कंपनी, फेरोडाय, रबर इंडिया आदींचा समावेश आहे. त्यातील ‘रबर इंडिया’ या एमआयडीसी अभिन्यासामधील भूखंड क्रमांक एफ-२ वर शनिवारी सायंकाळी पाच वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ केला जाणार आहे.(ekanth shinde thane )

या सोहळ्याला केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई व स्थानिक लोकप्रतिनिधी हजर राहणार आहेत. एसटी, आयटीआयचा भूखंड घेणार ताब्यात
क्लस्टर योजनेत बुश कंपनी, फेरोडाय, रबर इंडियाच्या भूखंडांचा समावेश आहे. तसेच एसटी व आयटीआय अशा दोन प्राधिकरणांच्या जागा ताब्यात घेण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.(eknath shinde cluster)

Eknath Shinde
Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात फेरीवाल्यांची दहशत; नागरिकांना सर्रास होतेय मारहाण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.