Boot Polish Tender Scam: रेल्वे, कंत्राटदारांकडून बूट पॉलिश कामगारांची लूट

Boot Polish Tender Scam: रेल्वे, कंत्राटदारांकडून बूट पॉलिश कामगारांची लूट

प्रतिकामगार २३,५२० रुपये कंत्राटदाराला द्या! ठाणे स्थानकावरील धक्कादायक प्रकार
Published on

नितीन बिनेकर

रेल्वे स्थानकावर वर्षानुवर्षे बूट पॉलिश करणाऱ्या कामगारांची रेल्वे आणि कंत्राटदाराकडून फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक माहिती ‘सकाळ’च्या हाती आली आहे. विशेष म्हणजे पूर्वी प्रतिकामगार महिन्याला जीएसटी धरून ४८० रुपये घेतले जात होते. आता चक्क महिन्याला २३ हजार ५२० रुपये मागत असल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे. बूट पॉलिश कामगारांनी यासंदर्भात रेल्वे महाव्यवस्थापकांपासून स्टेशन मास्टरपर्यंत तक्रारी केल्या आहेत; मात्र मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

Boot Polish Tender Scam: रेल्वे, कंत्राटदारांकडून बूट पॉलिश कामगारांची लूट
Mumbai Crime: ते पत्र बनावट? आठही महिला पोलीसांनी बलात्काराची तक्रार न केल्याची दिली स्पष्टोक्ती

मध्य-पश्चिम रेल्वेवर सध्या ५०० पेक्षा जास्त बूट पॉलिश कामगार आहेत. साधारणतः छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याणदरम्यानच्या स्थानकांवर १५० आणि सीएसएमटी ते पनवेल १०० बूट पॉलिश कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. दरमहा या बूट पॉलिश कर्मचाऱ्यांकडून रेल्वेकडून भाडे घेतले जाते. मध्य रेल्वेने स्थानकांवर बूट पॉलिश कामगारांसाठी निविदा प्रक्रिया राबवण्याची घोषणा केली होती. त्यानंतर बूट पॉलिश करणाऱ्या कामगारांनी विरोध केला होता; मात्र बूट पॉलिश कामगाराकडून जास्त शुल्क आकारले जाणार नाही, असे लॉलीपॉप दाखवत मध्य रेल्वेने मुंबई विभागातील ३५ स्थानकांसाठी १३ क्लस्टरमध्ये निविदा काढल्या होत्या. यामध्ये ‘क्लस्टर जे’मध्ये ठाणे-मुब्रा स्थानकांवर बूट पॉलिश करणाऱ्या कामगारांची कंत्राटदारांनी लूट सुरू केली आहे. महिन्याला चक्क २३ हजार ५२० कामगाराकडून मागत असल्याची धक्कादायक माहिती ठाणे स्थानकावर समोर आली आहे.

अशी केली वाढ

ठाणे स्थानकात गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून अनुसूचित जातीचे १२ बूट पॉलिश कामगार म्हणून कार्यरत आहेत, ज्यांचे परवाना शुल्क फक्त वार्षिक ५७ हजार रुपये होते. हे परवाना शुल्क बारा जणांना एकदाच भरावे लागत होते. त्यानंतर दरमहा ३०० रुपये भाडे द्यावे लागत होते, परंतु कंत्राटदार पद्धतीनंतर सहा लाख सहा हजार ६३० रुपये सुरक्षा ठेव आणि तीन लाख ३ हजार ३१५ रुपये प्रति तीन महिन्यांचे परवाना शुल्क वाढवण्यात आले. त्यावर १८ टक्के जीएसटी आणि २७ टक्के उपकर, याशिवाय ३५० रुपये प्रतिदिन सोसायटी शुल्क भरावे लागणार आहे. त्यामुळे बूट पॉलिश कामगारांना प्रतिमाह २३ हजार ५२० रुपये द्यावे लागणार आहेत; मात्र कामगारांनी यासंदर्भात विरोध केल्यानंतर त्यांची फसवणूक करून नवीन सोसायटी सुरू केली आहे. त्यामुळे बूट पॉलिश करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.

Boot Polish Tender Scam: रेल्वे, कंत्राटदारांकडून बूट पॉलिश कामगारांची लूट
Mumbai Crime : आठ महिला पोलीस शिपायांवर वरिष्ठांकडून बलात्कार, व्हिडीओही बनवले; घटनेने खळबळ

दरमहा शुल्क रुपयांत

परवाना - ८,३३३

सोसायटी- १०,५००

जीएसटी - ३,६९०

उपकर - ९९७

एकूण - २३,५२०

नवीन करार पद्धतीनुसार आम्हाला परवाना शुल्क, सोसायटी शुल्क आणि भरमसाट टॅक्स लावून प्रतिमहिना प्रतिकामगार २३ हजार ५२० रुपये द्यायचे आहेत. त्यानंतर क्रीम, खिळे, ब्रश आणि इतर साहित्यावर खर्च होणार आहे. त्यामुळे आम्ही व्यवसाय कसा करावा हा मोठा प्रश्न आहे.

- राजाराम शोभाराम, बूट पॉलीश कामगार, ठाणे

Boot Polish Tender Scam: रेल्वे, कंत्राटदारांकडून बूट पॉलिश कामगारांची लूट
Mumbai Central Railway: विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून वसूल केला २०.४९ कोटींचा दंड, मध्य रेल्वेची कारवाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.