Navi Mumbai: आगामी नवीन वर्ष हे निवडणुकांचे असले, तरी या वर्षात नवी मुंबईकरांना विविध नागरी प्रकल्प मिळणार आहेत. गेली तीन वर्षे बांधकाम सुरू असणारे सायन्स पार्क २०२४ च्या वर्षाअखेरीस नवी मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे, असा विश्वास महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी व्यक्त केला आहे.
याखेरीज नवी मुंबईकर शहरावर लवकरच सीसीटीव्हीचे नियंत्रण असणार आहे. शहरवासीयांना ऐरोलीतील दुसरे नाट्यगृहदेखील यावर्षभरात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आगामी वर्ष हे नवी मुंबईकरांसाठी प्रकल्पांची पूर्तता करणारे ठरेल, असे नार्वेकर यांनी सांगितले आहे.
कोविडसारख्या महामारीला मोठ्या धैर्याने तोंड दिल्यानंतर आता नवी मुंबई महापालिका प्रशासन स्थिरावले आहे. निवडणूक न झाल्यामुळे महापालिकेचा कारभार प्रशासकाच्या हाती आहे. एकीकडे खर्चाचा भार वाढत असला, तरी दुसरीकडे प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्यावर आयुक्त राजेश नार्वेकर यांनी भर दिला आहे.
नागरिकांना पायाभूत सुविधांपेक्षा अधिक वेगळ्या दर्जाच्या सुविधा देण्यावर नार्वेकर यांचा कल आहे. त्यानुसार चालू २०२४ या वर्षात नवी मुंबईकरांना प्रतीक्षेत असणारे सायन्स पार्क मिळणार आहे. नेरूळ येथील वंडर्स पार्कमध्ये तयार होत असणारे सायन्स पार्कची भव्य इमारत शहराच्या सौंदर्यात आणि नव्या पिढीच्या ज्ञानात भर घालणारी ठरणार आहे. आकाशातील गुढमय आणि रहस्यमय माहितीसह अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण देणारी ही वास्तू ठरणार आहे. ऐरोलीकरांना अनेक वर्षे वाट पाहावी लागणारे नाट्यगृह मिळणार आहे. त्यामुळे वाशीनंतर दुसरे नाट्यगृह नवी मुंबईकरांना मिळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.