Thane
Thanesakal

Thane: २०२५ पर्यंत ठाणे होणार चकाचक, कामांना आला वेग

Published on

Thane: स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत मुलुंड ते ठाणे दरम्यान विस्तारित ठाणे स्टेशनचे काम वेगाने सुरू आहे. या प्रस्तावित स्थानकाला जोडणाऱ्या तीनही उन्नत रस्त्यामधील एका रस्त्याचे काम वेगाने सुरू आहे. उर्वरित दोन मार्गाचे काम देखील लवकरच वेग घेणार आहे. ठाणे पालिका आणि रेल्वे यांच्यातील सामंजस्य कराराची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. सर्व काही वेळेवर झाल्यास, विस्तारित ठाणे स्थानक डिसेंबर २०२५ पर्यंत प्रवाशांसाठी तयार होणार आहे.

Thane
Thane Crime News: मुंबईत नववर्षानिमित्त रेव्ह पार्टीचे आयोजन, पोलिसांनी 100 जणांना घेतलं ताब्यात

मुंबई उच्च न्यायालयाने मार्च २०२३ रोजी जागेच्या हस्तांतरणावरील स्थगिती उठवली. यानंतर ठाणे ते मुलुंड स्थानकांदरम्यानच्या मनोरुग्णालयावर प्रस्तावित विस्तारित ठाणे रेल्वे स्थानक सुकर झाले. एप्रिलमध्ये राज्य सरकारने रुग्णालयासाठी १४.८३ एकर जागा विनाशुल्क पालिकेला हस्तांतरित केली होती. ठाणे स्थानकावरील गर्दी कमी करण्यासाठी रुग्णालयाच्या जागी नवीन स्थानक विकसित करण्यात येत आहे. ठाणे स्थानकातून दररोज सुमारे साडे लाख प्रवाशाची ये-जा करतात. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत यासाठी १४४.८० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.


डिसेंबरपासून या प्रकल्पाचे सुमारे २२ टक्के काम आजतागायत पूर्ण झाले आहे. एसएमसी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी हे काम करत आहे. विस्तारित ठाणे स्थानकात तीन फलाट बांधण्यात येणार आहेत. मुंबई सीएसटी आणि कल्याणसाठी जाणाऱ्या आणि ठाण्याहून सुटणाऱ्या लोकल नवीन स्टेशनवरून सुटणार आहेत.

Thane
Thane News: क्लस्टरचा आणखी एक नारळ फुटणार

विस्तारित ठाणे स्थानकाचे डेक तीन दोन स्वतंत्र उन्नत पदपथांनी जोडले जातील.
ज्ञानसाधना महाविद्यालय ते नवीन स्थानकासमोर २७५ मीटर लांबीचा रस्ता आहे.
मनोरुग्णालयासमोरून नवीन स्टेशनपर्यंत ३२७ मीटर लांबीचा रस्ता असेल.
मुलुंड एलबीएस टोलप्लाझा ते नवीन स्टेशनपर्यंतचा मार्ग ३२५ मीटर लांबीचा असेल.
तिन्ही मार्ग ८.५० मीटर रुंद असतील. डेक २७५ मीटर लांब आणि ३४ मीटर रुंद असेल. डेक जमिनीपासून सुमारे ७.५ मीटर उंच असेल.
डेकवर ठाणे महानगरपालिका परिवहन बस थांबा असेल.
डेकच्या खालचा रस्ता ऑटो रिक्षा आणि इतर वाहनांसाठी असेल.
….
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांच्या नेतृत्वाखाली स्मार्ट सिटी प्रोजेक्टअंतर्गत या नवीन स्थानकाचे काम वेगाने सुरू आहे.
- संदीप माळवी, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी प्रकल्प

Thane
Thane Crime News: प्रेयसीला मारहाण करत कारखाली चिरडले; भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा; तरुणी गंभीर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.