Panvel News: पनवेल महापालिकेचा झाला दुहेरी सन्मान
Panvel News: स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये पनवेल महापालिकेला केंद्र शासनाच्या गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाची सर्वोच्च मान्यता असलेले ‘वॉटर प्लस’ शहर प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. याबरोबरच कचरामुक्त शहरांसाठीचा (जीएफसी) थ्री स्टार दर्जा पनवेल शहरास प्राप्त झाल्याने पनवेल महापालिकेचा दुहेरी सन्मान मिळाला आहे.
देशातील चार हजारपेक्षा जास्त शहरांनी स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये सहभाग घेतला होता. देशातील ५८ शहरांना यावर्षी वॉटर प्लस मानांकन प्राप्त झाले आहे. महाराष्ट्रातील १८ शहरांना वॉटर प्लस मानांकन प्राप्त झाले आहे.
रायगड जिल्ह्यात वॉटर प्लस नामांकन सर्व प्रथम पनवेल महापालिकेस मिळाले आहे. याचबरोबर जीएफसी रेटिंग अर्थात कचरामुक्त शहरांमध्ये पनवेल महापालिकेने मागीलवर्षी प्रमाणे आपला ३ स्टार रेटिंगचा दर्जा टिकवून ठेवला आहे. पनवेल महापालिकेने आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली, उपायुक्त सचिन पवार, आरोग्य विभाग व मलनिस्सारण विभागाने आपल्या मेहनतीचा कस पणाला लावत वॉटर प्लस हे मानांकन प्राप्त केले आहे.
वॉटरप्लस मानांकन हे ओडिएफ मानांकनातील सर्वश्रेष्ठ मानांकन आहे. पालिका क्षेत्रातील पाच मलनिस्सारण केंद्राद्वारे शंभर टक्के मलयुक्त पाण्यावर प्रक्रियाकरून २० टक्के प्रक्रियाकृत पाण्याचा पुर्नवापर केला जातो. महापालिकेने यावर्षी खरेदी केलेल्या दोन सक्शन कम जेटिंग मशीनद्वारे शहरातील मलनिस्सारण वाहिन्यांबद्दल तक्रार निवारणाला गती दिली आहे.
------------------------------------
जनसहभागातून यशाला गवसणी
पनवेल महापालिकेने मशिनद्वारे स्वच्छेतला महत्त्व दिले आहे. प्रत्येक ठिकाणी मशिनद्वारे मॅनहोलची स्वच्छता केली जात आहे. सार्वजनिक शौचालयाची वेळोवेळी स्वच्छता व दुरूस्ती करण्यासाठी ‘स्वच्छता हर कदम’ ॲपद्वारे शौचालयांची देखरेख ( मॉनिटरिंग) सुरु करून स्वच्छतेत आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. तसेच कचरा वर्गीकरणाबाबत केलेल्या आवाहनाला नागरिकांमधून प्राधान्याने महिला वर्गामधून उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने कचरामुक्त शहरांसाठीचा थ्री स्टार दर्जा पनवेल पालिकेने टिकवला आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी उपक्रमांना भरभरून प्रतिसाद दिल्याने वॉटर प्लस मानांकन प्राप्त झाले आहे. शहराच्या विकासात नागरिकांचा सहभाग सर्वात महत्त्वपूर्ण असतो.
- गणेश देशमुख, आयुक्त पनवेल महापालिका
----------------------------------------
महानगरपालिकेच्या ‘स्वच्छता हर कदम’ ॲप द्वारे सार्वजनिक शौचालयांच्या मॉनिटरिंग यंत्रणेची केंद्र सरकारद्वारे दखल घेतली आहे. अशा नवनवीन यंत्रणेच्या माध्यमातून घनकचरा व स्वच्छता विभाग अधिक सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे.
- सचिन पवार, उपायुक्त, पनवेल महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.