mumbai pune express way
mumbai pune express way sakal media

Mumbai Pune Express Way: नागरिकांनो लक्ष द्या; मुंबई -पुणे एक्स्प्रेसवेवर आज दोन तासांचा ब्लॉक!

Published on

महामार्ग वाहतूक पोलिसांकडून मुंबई-पुणे दुतग्रती महामार्गावर सर्व्हिसिएबल गॅन्ट्री बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे गुरुवारी (ता. ११) दुपारी दोन तास मुंबई वाहिनी पूर्णतः बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

mumbai pune express way
Mumbai Pune Express Way: द्रुतगती मार्गावर आज दोन तास मेगा ब्लॉक!

हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम या प्रकल्पांतर्गत नोव्हेंबर २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर दोन्ही वाहिनीवर टू लेग व थ्री लेग सर्व्हिसिएबल गॅन्ट्री बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामासाठी पळस्पे हद्दीत मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवर गुरुवार दुपारी १.३० ते ३.३० या कालावधीत गॅन्ट्री बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे या वाहिनीवरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय महामार्ग वाहतूक पोलिसांनी घेतला आहे.

mumbai pune express way
Mumbai Pune Express Way: महामार्गावरील अपघात तब्बल इतक्या टक्क्यांनी घटले; हे आहे कारण

याबाबतचे परिपत्रक राज्याचे वाहतूक विभागाचे अपर पोलिस महासंचालक रवींद्र कुमार सिंगल यांनी जारी केले आहे. या कामामुळे एक्स्प्रेसवेवर वाहतूक कोंडी निर्माण होऊन वाहन चालकांची गैरसोय होऊ नये, यासाठी वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्ग निश्चित केले आहे. त्यानुसार पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहने खोपोली एक्झिट येथून वळवून जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून खोपोली शहरातून पुढे शेडुंग टोल नाका मार्गे मुंबई वाहिनीवरून जाण्यासाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.

तर हलक्या व जड अवजड वाहनांना खालापूर टोल नाका येथून शेवटच्या लेनने खालापूर एक्झिट येथून जुना पुणे मुंबई मार्गावरून खोपोली शहरातून पुढे शेडुंग टोल नाका मार्गे मुंबईच्या दिशेने जाण्यास मार्ग निश्चित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग ४८ वरून पुणे बाजूकडून मुंबई बाजूकडे जाणाऱ्या वाहनांना शेडुंग फाट्यावरून बोर्ले टोल नाक्याऐवजी सरळ पनवेलच्या दिशेने जाण्यास मार्ग निश्चित करण्यात आला आहे.

mumbai pune express way
Mumbai Pune Express Way: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ३ तासांचा ब्लॉक; या पर्यायी मार्गांचा करा वापर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.