Navi Mumbai: तांदळाचे पोळे वाढवता आहेत मकरसंक्रातीची शान

Navi Mumbai: तांदळाचे पोळे वाढवता आहेत मकरसंक्रातीची शान

Published on

मकर संक्रांती तीळगूळ देऊन साजरी केली जाते; पण उरण परिसरात भातशेती प्रामुख्याने केली जात असल्याने तांदळापासून बनणाऱ्या विविध पदार्थांची रेलचेल अधिक पाहायला मिळते. त्यामुळे सणानिमित्त घरगुती पद्धतीने बनवले जाणारे पोळे आगरी संस्कृतीची शान बनली आहे,
उरण परिसरात सण उत्सवात पोळे, धिरडे, सांदण, आंबोळ्या, कोंड्याचे पेले, घाऱ्या, वडे, पानगा असे तांदळापासून विविध पदार्थ बनवले जातात.

संक्रांतीच्या अगोदरच काही दिवस तांदूळ स्वच्छ धुऊन वाळवले जातात. त्यानंतर त्यात मूठभर चवळ्या- मेथी घालून हे पीठ गिरणीत दळले जाते. संक्रांतीच्या आदल्या दिवशी रात्री आप्तस्वकियांमध्ये वाटता येतील, याचा अंदाज घेतला जातो.

Navi Mumbai: तांदळाचे पोळे वाढवता आहेत मकरसंक्रातीची शान
Navi Mumbai Metro rates: मेट्रो सुरू होऊन ५० दिवस झाले नवी मुंबईकरांचा होतोय द्राविडी प्राणायाम, तिकीट दर होणार कमी?

मोठ्या टोपात गूळ-मीठ घालून रात्री आंबवले जाते. सकाळी भल्या पहाटे संक्रांतीच्या दिवशी उठून घरातील गृहिणी, चुलीवर भिन ठेऊन पोळ्यांचे पीठ डोशासारखे पसरवले जाते. या पोळ्यांची चव फार वेगळी लागते. त्यामुळे पोळे बनवण्याची पद्धतीला उरण परिसरात अनन्यसाधारण महत्त्व आले आहे.

मित्रमंडळींना जेवणाचे निमंत्रण
मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी दोन-दोन पोळे घेऊन घरोघरी त्याचे वाटप करण्यात येते. त्यावर तिळाचा लाडू ठेवला जातो. घरोघरी हे पोळे वाटण्यापूर्वी घरातील कुलदैवतांना, गावदेवीला पोळ्यांचा नैवेद्य दाखवला जातो. उरण परिसरात पूर्वी कोंबड्याचा मान दाखवला जात होता. ही प्रथा आजही अनेक घरात पाळली जात असून मित्रमंडळी, नातेवाईकांना जेवणाचे निमंत्रण दिले जाते.

Navi Mumbai: तांदळाचे पोळे वाढवता आहेत मकरसंक्रातीची शान
Navi Mumbai Murder: सीवूड्स भागात बांधकाम व्यवसायिकाची हत्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.