CM Eknath Shinde
CM Eknath Shinde esakal

Ekanth Shinde: शिवसेना शिंदे गटातर्फे महाआरोग्य शिबिर!

Published on

Shinde Shivsena: स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उत्तर मुंबईतील नागरिकांसाठी नुकतेच शिवसेना सचिव सिद्धेश रामदास कदम यांच्या वतीने अनेक ठिकाणी महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. तीन हजारांहूनही जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.

CM Eknath Shinde
Ekanth Shinde: मुख्यमंत्र्यांचे सरकारी वर्षा निवासस्थान गुन्हेगारांसाठी पर्यटनस्थळ झाले आहे का ?

महाआरोग्य शिबिरात नेत्र तपासणी, मोफत चष्मा वाटप, स्त्रियांचे आजार, कर्करोग तपासणी, बालरोग चिकित्सा, दंत चिकित्सा, रक्तदाब तपासणी, मधुमेह, कान नाक घसा तपासणी, औषधोपचार, ई.सी.जी. तपासणी, सी.बी.सी. तपासणी आदी तपासण्या झाल्या. यातील कांदिवली पूर्वेच्या वडारपाडा येतील शिबिराच्या उद्‌घाटनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.

CM Eknath Shinde
Ajit Pawar Vs Ekanth Shinde : तुमच्या ठाण्यात एवढे मृत्यू कसे ? अजित पवारांचा थेट CM शिंदेंना सवाल

या शिबिरासाठी लाईफ लाईन रुग्णालय, रिद्धी विनायक रुग्णालय, प्रगती रुग्णालय, नवनीत हाय-टेक रुग्णालय, ऑस्कर रुग्णालय, गॅलेक्सी हेल्थ केअर रुग्णालय, सेव्हन स्टार रुग्णालय आदींचे सहकार्य लाभले.

हे महाआरोग्य शिबिर मालाड विधानसभा (शाखा क्र. ३४), विश्वशांती बुद्धविहार ट्रस्ट, मालवणी गेट नं. ५, मालाड पश्चिम, चारकोप विधानसभा (शाखा क्र. ३१), गणेश नगर, हनुमान मंदिर, चारकोप, कांदिवली पश्चिम, कांदिवली विधानसभा शाखा क्र. २९, श्री हनुमान मंदिर, वडारपाडा, कांदिवली पूर्व, बोरिवली विधानसभा (शाखा क्र. १३) एम.जी. रोड, नियर संजय हॉटेल, हेमराज शाळा, बोरिवली पश्चिम, दहिसर विधानसभा (शाखा क्र. ६) चांडक एस.आर.ए. कंपाऊंड, दहिसर, बोरिवली पश्चिम आणि मागाठाणे विधानसभा (शाखा क्र. २६) नालंदा बुद्धविहार, दामू नगर, कांदिवली पूर्व, मुंबई आदी ठिकाणी आयोजित करण्यात आले होते.

CM Eknath Shinde
CM Ekanth Shinde : सासवडला आज मुख्यमंत्र्यांची सभा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()