Navi Mumbai: नवी मुंबई महानगरपालिकेचा अनधिकृत बांधकामावर कारवाईचा धडाका

Navi Mumbai
Navi Mumbaiesakal
Published on

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा धडाका लावण्यात आलेला आहे. तुर्भे विभागाअंतर्गत असणाऱ्या सानपाडा सेक्टर १५ येथील एका अनधिकृत घराच्‍या बांधकामावर पालिकेने तोडक कारवाई केली आहे.

Navi Mumbai
Ayodhya Ram Mandir: Navi Mumbai च्या Vitthal Kamble यांना Prabhu Shreeram च्या पूजेचा मान

येथील पिंपळवाडामधील वनिता अशोक पाटील यांचे घर क्रमांक ११९ येथे विनापरवाना बांधकाम सुरू होते. याला पालिकेकडून नोटीस बजावण्यात आली होती. तसेच २४ तासांच्‍या आत हे बांधकाम पाडण्याचे आदेश देण्यात आले होते. शिवाय तुर्भे पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रारदेखील करण्यात आली होती.

Navi Mumbai
Navi Mumbai : नवी मुंबईमध्ये कांदा-बटाटा बाजारात चोरांचा सुळसुळाट ; वाचा नक्की काय आहे प्रकरण

विशेष म्‍हणजे हे बांधकाम यापूर्वी पालिकेने १२ जानेवारी २०२३ मध्ये निष्कासित केले होते. तरीदेखील पुन्‍हा ते बांधकाम करण्यात येत होते. त्‍यामुळे पालिकेने ही तोडक कारवाई केली.

या वेळी सिडको अतिक्रमण विभागातील मुख्य अधिकारी वेणु नायर व तुर्भे विभाग अधिकारी भरत धांडे उपस्‍थित होते. या मोहिमेसाठी सिडको, अतिक्रमण निर्मूलन पथकातील पोलिस अधिकारी, पालिका अतिक्रमण विभागातील अधिकारी उपस्‍थित होते. अनधिकृत बांधकाम हटवण्याकरिता सिडकोकडील पोकलेन, जेसीबी यांचा वापर करण्यात आला.

Navi Mumbai
Navi Mumbai: दिवसा घरफोडी करणारी आंतरराज्य टोळी अटकेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.