Navi Mumbai: वाशी खाडीवर पुलावरून पडून कामगाराचा मृत्यू

accident
accident sakal
Published on

Navi Mumbai: वाशी खाडीवर उभारण्यात येत असलेल्या नवीन पुलावर वेल्डिंगचे काम करणारा तरुण सेफ्टीबेल्ट अडकवलेल्या लोखंडी प्लेटसह घसरून खाडीमध्ये पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. अमन सहानी (वय २४) असे या तरुणाचे नाव असून वाशी पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली.

accident
Navi Mumbai: नवी मुंबई महानगरपालिकेचा अनधिकृत बांधकामावर कारवाईचा धडाका

अमन सहानी हा उत्तर प्रदेश राज्यातील असून सध्या तो मानखुर्द येथील महाराष्ट्र नगरमध्ये कामगारांसाठी असलेल्या घरामध्ये राहत होता. तो वाशी खाडीपुलावर उभारण्यात येत असलेल्या नवीन पुलावर काम करत होता. शुक्रवारी दुपारी अमन हा पुलावर वेल्डिंगचे काम करत होता. या वेळी अमनने ज्या लोखंडी प्लेटला सेफ्टी बेल्ट अडकवला होता, त्या लोखंडी प्लेटसहीत तो घसरून खाडीमध्ये पडला.

या वेळी इतर कामगारांच्या हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्यांनी खाडीमध्ये उडी टाकून त्याला बाहेर काढले. त्यानंतर त्याला वाशीतील एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानुसार पोलिसांनी या घटनेची अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

accident
Navi Mumbai: दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने डिलीव्हरी बॉयचा मृत्यू

कंपनीकडून सुरक्षा व्यवस्था नसल्याचा आरोप
अमन सहानी हा तरुण काम करताना खाडीत पडल्यानंतर त्याला पाण्यातून बाहेर काढण्यास बराच कालावधी लागला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. वाशी खाडीवरील नवीन पुलाच्या बांधकामाच्या ठिकाणी एखादा कामगार खाडीत पडल्यास त्याला तत्काळ वाचवण्यासाठी कंपनीकडून कोणतीच व्यवस्था करण्यात आली नसल्याचे येथील कामगारांचे म्हणणे आहे. अमनला तत्काळ पाण्याच्या बाहेर काढले असते, तर तो वाचला असता, असेही येथील कामगारांनी सांगितले.

accident
Navi Mumbai : नवी मुंबईमध्ये कांदा-बटाटा बाजारात चोरांचा सुळसुळाट ; वाचा नक्की काय आहे प्रकरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.