Mumbai Police: देशाच्या आर्थिक राजधानीत पोलिसांचा तुटवडा, १२ हजारांपेक्षा अधिक पदं रिक्त
Mumbai Police: मुंबई पोलिस दलात मनुष्यबळाचा तुटवडा भासत असल्याचे समोर आले आहे. सध्या अपर पोलिस आयुक्तपदापासून शिपाईपदापर्यंत १२ हजार ८९९ पदे रिक्त असल्याची माहिती उघड झाली आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पोलिस आयुक्त कार्यालयाकडे अर्ज करून मंजूर पदे, कार्यरत पदे आणि रिक्त पदांची माहिती विचारली होती. मुंबई पोलिस आयुक्तलयाचे सहायक पोलिस आयुक्त विनोद कांबळे यांनी ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंतची माहिती दिली.
मुंबई पोलिस दलात एकूण मंजूर पदांची संख्या ५१,३०८ आहेत. यात ३८,४०९ कार्यरत पदे असून १२,८९९ पदे रिक्त आहेत. पोलिस शिपायाची २८,९३८ पदे मंजूर आहेत. यापैकी १७,८२३ कार्यरत पदे असून ११,११५ पदे रिक्त आहेत. यानंतर पोलिस उपनिरीक्षकाची ३,५४३ पदे मंजूर असताना फक्त २,३१८ कार्यरत पदे असून १,२२५ पदे रिक्त आहेत. पोलिस निरीक्षकाची १,०९० मंजूर पदे असून यापैकी ३१३ पदे रिक्त आहेत.
सध्या ९७७ कार्यरत पदे आहेत. सहायक पोलिस आयुक्ताची १४१ पैकी २९ पदे रिक्त आहेत. पोलिस उपायुक्ताची ४३ पदे मंजूर असून ३९ पदे कार्यरत आहेत. यात ४ पदे रिक्त आहेत; तर अप्पर पोलिस आयुक्तपदाचे १२ पैकी फक्त १ पदे रिक्त आहेत. मंजूर पदे ही पूर्वीपासून असून यात काही बदल झाला नाही. पण, प्रत्येक वर्षी सेवानिवृत्तीमुळे रिक्त पदांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. यात काळानुसार बदल करत रिक्त पदे भरताना मंजूर पदांची संख्या वाढवली, तर मुंबई पोलिसांवर येत असलेला ताण कमी होईल, असे गलगली यांनी नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.