Navi Mumbai
Navi Mumbaiesakal

Navi Mumbai: तळोज्याकरांसाठी आनंदवार्ता; विविध विकासकामांसाठी भूखंड मंजूर!

Published on

Navi Mumbai: नव्याने विकसित होत असलेल्या तळोजा वसाहतीत जवळपास चाळीस सेक्टरचा समावेश आहे. अशातच सिडकोने केवळ एक स्वच्छता गृह उभारले आहे. तर फळ, भाजी मार्केट, स्वच्छता गृह आणि शाळा सुरु करण्यासाठी भूखंडाची मागणी होत असताना सिडकोने पालिकेला भूखंड उपलब्ध करून दिल्यामुळे तळोज्याकरांसाठी ही आनंदाची वार्ता आहे.

Navi Mumbai
Navi Mumbai Crime: हद्दपार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात; गस्ती पथकाने पकडले

तळोजा वसाहतीत पालिकेने शाळा सुरु करावी, यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते अंकुश गायकवाड पाच वर्षांपासून पालिकेकडे पत्र व्यवहार करीत आहे, तर सामाजिक कार्यकारी राजीव सिन्हा यांनी तळोजा फेज दोन वसाहतीत भाजी मार्केट आणि स्वच्छतागृहासाठी सिडको आणि पनवेल महापालिकेकडे पत्र व्यवहार केला आहे.

पण या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे याप्रकरणी लोक आयुक्तांकडे लेखी तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन लोक आयुक्तांनी सिडको आणि पालिकेला पत्र पाठवून खुलासा करण्यास सांगितले होते. त्याला उत्तर देताना पालिकेने सिडकोकडून भाजी मार्केट आणि शाळेसाठी भूखंड उपलब्ध झाल्याचे सांगितले आहे. त्यामुळे तळोजा फेज दोनमध्ये स्वच्छतागृह सह भाजी मार्केट आणि शाळेसाठी भूखंड उपलब्ध झाल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.

Navi Mumbai
Navi Mumbai: नवी मुंबई महानगरपालिकेचा अनधिकृत बांधकामावर कारवाईचा धडाका

४० सेक्टरसाठी एकच स्वच्छतागृह
तळोजा फेज एक वसाहतीत एक ते पंधरा सेक्टरचा समावेश आहे. तर फेज दोनमध्ये सोळापासून चाळीस सेक्टरचा समावेश होतो. सिडकोने फेज एक मधील सेक्टर नऊ एकमेव स्वच्छतागृह उभारले आहे. विशेष म्हणजे चौक, बसथांबा, मार्केट आदी ठिकाणी एकही स्वच्छतागृह स्वच्छतागृह नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. वर्षभरापूर्वी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पालिकेकडे स्वच्छता गृहाची मागणी केली होती. तेव्हा अधिकाऱ्यांनी पाहणी करून स्वच्छतागृह उभारले जाईल, असे सांगितले. मात्र, वर्षे उलटून गेले तरी उपाययोजना केलेली नाही.

Navi Mumbai
Navi Mumbai: वाशी खाडीवर पुलावरून पडून कामगाराचा मृत्यू

सिडकोकडून तळोजा सेक्टर सातमध्ये शाळेसाठी भूखंड उपलब्ध झाला आहे. तर फेज दोनमध्ये स्वच्छतागृहासाठी भूखंडाचे पत्र प्राप्त झाले असून पुढील प्रक्रिया सुरु आहे.
- कैलास गावडे, उपायुक्त, पनवेल महापालिका

शाळेसाठी प्राप्त झालेल्या भूखंडावर पालिकेने शाळेचे बांधकाम तातडीने सुरु करावे. यासाठी आयुक्ताची भेट घेणार आहे.
- अंकुश गायकवाड, काँग्रेस कार्यकर्ता

Navi Mumbai
Navi Mumbai Crime: सोने पॉलिश करुन देण्याच्या बहाण्याने दागिने लुबाडले; पोलिसांकडून शोध सुरु

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.