Winter In Mumbai
Winter In MumbaiSakal

Winter In Mumbai: मुंबईकरांनो काळजी घ्या; येत्या काळात वाढणार थंडीचा तडाखा

Mumbaikars take care; The cold weather will increase in the coming period
Published on

Winter In Mumbai: मुंबईतील किमान तापमानात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. मंगळवारी मोसमातील सर्वात नीचांकी तापमान नोंदवले गेले. किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता असून यामुळे शीतलहर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Winter In Mumbai
Mumbai Pollution: मुंबईकरांनो काळजी घ्या ; प्रदूषणामुळे वाढत आहे 'या' आजारांची संख्या

मंगळवारी सांताक्रूझ येथे १४.८ किमान तापमान नोंदवण्यात आले. ही यंदाच्या मोसमातील सर्वांत नीचांकी नोंद ठरली, तर कुलाबा येथे १९.६ किमान तापमानाची नोंद झाली. यामुळे पवई, बोरिवली, सांताक्रूझ, सायन, चेंबूर भागात लोकांना बोचऱ्या थंडीचा अनुभव आला. संपूर्ण महाराष्ट्रात २३ ते २६ जानेवारीदरम्यान थंडीची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. मुंबई एमएमआर परिसरात पुढील ७२ तासांत किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. हे तापमान १३-१५ डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली जाईल, असा अंदाज आहे.

Winter In Mumbai
Mumbai Air Pollution: मुंबईकरांनो काळजी घ्या : मुंबई हवेचा दर्जात सुधारणा नाहीच!

सांताक्रूझ पुन्हा एकदा १३ अशांपर्यंत, ठाणे १४-१५ अंश, कल्याण आणि अंतर्गत भागात १२-१३ अंशाला स्पर्श होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात विशेषतः राज्याच्या उत्तर भागात थंडीचा कडाका वाढणार आहे.

काही ठिकाणचे किमान तापमान १०-११ अंशांपर्यंत खाली जाऊ शकते. सध्या जळगाव, नाशिकजवळील भागात तापमान एकेरी आकड्यात आले आहे. त्यात आणखी घट होण्याची शक्यता असून परिणामी मुंबईकरांनाही शीतलहरीसाठी सज्ज व्हावे लागेल, असे सांगितले जात आहे.

Winter In Mumbai
Mumbai Health News: मुंबईकरांनो काळजी घ्या; हवामान बदलामुळे होऊ शकतो... !

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()