श्रीराम मंदिर उद्घाटन सोहळ्याला मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे उद्धव ठाकरे बेचैन झाले आहेत - प्रविण दरेकर
BJP Attackes Uddhav Thackeray: अयोध्येत श्रीराम मंदिर उद्घाटन सोहळ्याला मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे उद्धव ठाकरे बेचैन झाले आहेत. त्यातूनच त्यांची बडबड सुरू आहे, असा टोला भाजपचे विधान परिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर यांनी आज लगावला. नाशिक येथील मेळाव्यात ठाकरे यांनी भाजपवर टीका केली. त्याला दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले.
‘उद्धव ठाकरे यांचा तोल ढासळलेला आहे. राम मंदिर उद्घाटन सोहळ्यामुळे भाजपविषयी जनमानसात सहानुभूती निर्माण झाली. त्याची मळमळ उद्धव ठाकरेंना होताना दिसत आहे’, असेही दरेकर यांनी सुनावले. उद्धव ठाकरेंनी गेल्या काही वर्षांत ज्या रावणी प्रवृत्तीने काम केले, त्यामुळे त्यांच्या अधोगतीला सुरुवात झाली आहे. येत्या निवडणुकीत देशातील जनता त्यांची रावणी प्रवृत्ती भस्मसात केल्याशिवाय राहणार नाही. काल राज्यातील प्रत्येक घराघरात, गल्लीगल्लीत, वाड्या-वस्त्यांवर नागरिक राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पाहत होते. याचा पोटशूळ उद्धव ठाकरेंना झाला असून बेताल बडबड करणे हा त्यांचा स्थायीभाव झाला आहे, अशी टीकाही दरेकर यांनी केली.(latest mumbai marathi news)
‘रामावर बोलण्याचा अधिकार नाही’
संजय राऊत यांची राजकीयदृष्ट्या शेवटची घटका आलेली दिसत आहे. स्वतः रावणासारखे वागणारे संजय राऊत भरकटले आहेत. पंतप्रधान मोदींवर बोलायची त्यांची पात्रता नाही, अशी टीकाही दरेकर यांनी केली. राम ही आमची मालमत्ता आहे, असे आम्ही कुठेही म्हणत नाही; पण तुमच्या कृतीतून कोठेही रामभक्ती प्रकट होत नाही. तुम्ही ज्यांच्या सोबत आहात, ज्यांचे विचार आचारात आणत आहात ते रामाच्या श्रद्धेचे स्थान नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंना रामावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, असेही दरेकर म्हणाले.(latest marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.