Railway News: 'द्रोणागिरी' स्थानका ऐवजी 'बोकडविरा' नावासाठी ग्रामस्थांचा आग्रह
Uran News: उरण रेल्वे सुरू होऊन जवळपास दोन आठवडे लोटले आहेत. मात्र, रेल्वेस्थानकांच्या नामांतराचा प्रश्न अजूनही अधांतरीच आहे. अशातच बोकडविरा गावाच्या महसुली हद्दीतील रेल्वेस्थानकाला प्रशासनाने ‘द्रोणागिरी’ नाव दिले आहे. त्यामुळे द्रोणागिरी स्थानकाऐवजी बोकडविरा नावासाठीचा आग्रह ग्रामस्थांकडून धरला जात आहे.
अनेक दशकांपासून उरणकरांना असलेली रेल्वेची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली आहे. उरण रेल्वे सुरू झाल्यामुळे उरण शहरातील पूर्व, तसेच पश्चिम विभाग नागरिकांना दळणवळणासाठीचे साधन उपलब्ध झाले आहे. मात्र, रेल्वेस्थानकांच्या नामांतराचा प्रश्न अजूनही ‘जैसे थे’ आहे. उरण रेल्वेस्थानकादरम्यान येणाऱ्या स्थानकांना महसुली हद्दीत येणाऱ्या गावाचे नाव द्यावे, अशी मागणी केली जात आहे. उरण रेल्वे मार्गावरील अनेक स्थानकांच्या नावावरून यापूर्वीच वाद सुरू झालेला आहे. अशातच बोकडविरा गावच्या महसुली हद्दीत स्थानकाला ‘द्रोणागिरी’ असे नाव देण्यात आले असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. या स्थानकाचे नाव बदलण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. मात्र, सिडको तसेच रेल्वे प्रशासना दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थांत नाराजी आहे.
मुदतीचा सिडकोला विसर
सिडकोने ग्रामस्थांना एक महिन्याचा कालावधी दिला होता; मात्र या मुदतीनंतरही कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी झाली नसल्याने ग्रामस्थांचा रोष पत्करावा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे रेल्वेस्थानकासाठी बोकडविरा ग्रामस्थांच्या जमिनी संपादन करणाऱ्या सिडकोने स्थानिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करू नये, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
बोकडविरा गावच्या महसुली हद्दीत येणाऱ्या स्थानकाचे नाव ‘द्रोणागिरी’ असे दिले आहे, पण स्थानकाचे नाव बदलावे, अशी आमची मागणी आहे. कारण हा आमच्या गावाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे.
- अपर्णा पाटील, सरपंच, बोकडविरा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.