Mumbai News: रामलल्लांसाठी मुंबईतून सात फुटी सोनेरी तलवार!

Mumbai News: रामलल्लांसाठी मुंबईतून सात फुटी सोनेरी तलवार!

Published on

Ram Mandir: जुन्या काळातील शास्त्रांचे अभ्यासक आणि निर्माते नीलेश व अरुण सकट यांनी अयोध्येतील रामलल्लासाठी सात फूट तीन इंच उंचीची नंदक खड्ग (तलवार) तयार केली असून, ती त्यांनी आज श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला भेट दिली. या तलवारीचे वजन ८० किलो असून पितळ आणि सोने यापासून ती बनवली आहे; मात्र यात नेमके किती सोने आहे, याची माहिती त्यांनी दिली नाही.

Mumbai News: रामलल्लांसाठी मुंबईतून सात फुटी सोनेरी तलवार!
Navi Mumbai Crime: ३ किलो ८० ग्रॅम वजनाचे शुद्ध सोने घेवून मालक झाला फरार; वाचा संपूर्ण बातमी

नीलेश व अरुण यांचे पूर्वज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यासाठी वेगवेगळी शस्त्रास्त्रे तयार करत असत, असा त्यांचा दावा आहे. सर्वोच्च न्यायालयाने मंदिराची ही जागा जेव्हा राम जन्मभूमी मंदिरसाठी दिली, तेव्हाच अशी तलवार रामलल्लांना भेट देण्याचे नीलेश व अरुण यांनी ठरवले होते. ती इच्छा पूर्ण झाल्याबद्दल नीलेश सकट यांनी आज समाधान व्यक्त केले. श्रीरंग तातू सकट आणि मालन श्रीरंग सकट यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे खड्ग तयार करण्यात आले आहे. आज नीलेश आणि अरुण यांच्यासह गणेश, अमर आणि अन्य सहकारी ही तलवार घेऊन अयोध्येत गेले होते.

पुराणातील एका कथेनुसार ब्रह्मदेवांनी सुमेर पर्वत शिखरावर यज्ञ केला. तेथे त्यांना लोहदैत्य दिसला. हा राक्षस आपल्या यज्ञात विघ्न आणेल अशी शंका ब्रह्मदेवांना येताच त्या यज्ञाच्या अग्नीतून एक महाबलवान पुरुष प्रकट झाला. त्याने तलवारीचे रूप घेतल्यावर त्याला नंदक हे नाव देण्यात आले. नंतर देवांच्या सांगण्यावरून श्रीकृष्णाने ते खड्ग हाती घेऊन लोहदैत्याचे तुकडे तुकडे केले अशी कथा आहे. त्यामुळे ती तलवार नंदक खड्ग म्हणून ओळखली जाते. त्या कथेच्या आधारे ही तलवार तयार करण्यात आली आहे.

Mumbai News: रामलल्लांसाठी मुंबईतून सात फुटी सोनेरी तलवार!
Navi Mumbai Crime: हद्दपार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात; गस्ती पथकाने पकडले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.