Railway News
Railway News esakal

Railway News: कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण करा; केंद्रीय मंत्र्यांची मागणी

Published on

Railway News: कोकण रेल्वेच्या कामगारांच्या शिष्टमंडळाने नुकतीच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भेट घेऊन कोकण रेल्वेला भारतीय रेल्वेत विलीन करून स्वतंत्र झोन तयार करण्याची मागणी केली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची लवकरात लवकर भेट घेऊ, असे आश्वासन आठवले यांनी शिष्टमंडळाला दिले आहे.


कोकण रेल्वे ही स्वतंत्र कंपनी असून या कंपनीचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे विचाराधीन आहे. कोकण रेल्वेचे मध्य रेल्वे झोन आणि साऊथ वेस्ट झोनमध्ये विभागणी करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. देशात रेल्वेचे १६ झोन आहेत. कोकण रेल्वेचा नवीन झोन तयार केल्यास देशात रेल्वेचे १७ झोन होतील.

Railway News
Railway News: 'द्रोणागिरी' स्थानका ऐवजी 'बोकडविरा' नावासाठी ग्रामस्थांचा आग्रह

के. आर. सी. एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष सुभाष माळगी, कोकण रेल्वे एससीएसटी असोसिएशन अध्यक्ष नारायणदास अहिरवार, ओबीसी असोसिएशनचे रामनाथ पाटील, रिपाइं नेते सुनील गमरे, मोहन खेडेकर, राघवेंद्र नाईक, राजेश देसाई, राहुल पवार यांच्या शिष्टमंडळाने रामदास आठवले यांना निवेदन दिले.

Railway News
Railway News: आता रेल्वेचा स्पिड होणार अजूनच सुपरफास्ट; घेतला महत्वाचा निर्णय!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.