Crime News
Crime Newssakal

Bhiwandi News: तुपानंतर आता भिवंडीत बनावट जिऱ्याचा कारखाना पोलिसांनी केला सील

Published on

Crime News: नंडोरे येथे बनावट जिरेनिर्मिती कारखाना पोलिसांनी शनिवारी सील केला. या ठिकाणी रसायने वापरून जिऱ्याची निर्मिती केली जात होती. या बनावट जिऱ्याची मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याचे समोर आले असून या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.


भिवंडी येथे बनावट जिरे विक्री करण्यासाठी काही जण येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पालघरमधून शाबाद इस्लाम खान, तर कांदिवली पश्चिमेतून चेतन रमेश गांधी अशा दोघांना ताब्यात घेतले. आरोपीची अधिक चौकशी केली असता पालघर येथील बनावट जिरा कारखान्याचा तपास लागला.

Crime News
Nashik Crime News : बेरोजगार मित्राने उकळली मैत्रिणीकडून खंडणी; मुंबई नाका पोलिसात गुन्हा

पोलिस आयुक्त नवनाथ ढवळे, सहायक आयुक्त ईश्वर खैरनार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर इंदलकर यांच्या इंदलकरांच्यापथकाने सापळा रचून नागाव फातिमा नगर येथे एक संशयित टेम्पो जप्त केला. त्यात ८० गोण्यांमध्ये सात लाख २१ हजार सातशे रुपये किमतीचे बनावट जिरे पोलिसांनी जप्त केले.

त्यानंतर नंडोरे येथील नोव्हेल इंडस्ट्रिअल इस्टेटमध्ये जागृती एंटरप्राइजेस नावाचा बनावट जिरेनिर्मिती कारखाना सुरू करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार सदर कारखाना हा सील करण्यात आला. दरम्यान येथील माजी सरपंच दिनेश कान्हात यांनी नंडोरे ग्रामपंचायतीकडे सदर कारखान्याच्या परवानगीबाबत तक्रार दाखल केल्याची माहिती कान्हात यांनी दिली.

Crime News
Jalgaon Crime News : पळासखेडेचे तत्कालीन ग्रामसेवक, महिला सरपंचाविरुद्ध गुन्हा दाखल

कच्चा माल गुजरातमधून


लाकडाचा भुसा व रसायने, बडीशेपचा काढून टाकलेला टोकाचा भाग बनावट जिरे तयार करण्यासाठी वापरला जात होता.

त्यासाठी लागणारा कच्चा माल गुजरातमधील उंझा इथून आणला जात होता. या बनावट जिऱ्याची ठाणे, नवी मुंबई, भिवंडी आदी परिसरातील हॉटेलवर तसेच धाब्यांवर मोठ्या प्रमाणात विक्री केली जात होती. बनावट जिरे पाण्यात टाकले असता त्यातून काळा रंग आणि रसायने पाण्यात मिसळली जातात.

Crime News
Nashik Crime News : घोटीतील ‘त्या’ खुनाचा 12 तासांत उलगडा; मित्राच्या मदतीने पतीचा घात

बाजारात कमी दराने विक्री


बनावट जिऱ्याचा वापर जिरा राईस करण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जात असल्याची माहिती समोर आली आहे.

बाजारात साडेचारशे रुपये किलो दराने विकल्या जात असलेल्या मूळ जिऱ्यापेक्षा हे बनावट जिरे अडीचशे ते तीनशे रुपये किलो इतक्या कमी दराने विकले जात होते. त्यामुळे व्यावसायिकांची या बनावट जिऱ्याला पसंती होती.

Crime News
Pune Crime News : फसवणूक केल्याप्रकरणी माजी नगरसेवकासह मुलावर आणखी एक गुन्हा दाखल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()