Theft
Theftesakal

Crime News: उरणमध्ये वाढले चोऱ्यांचे प्रमाण, तरुणांनी हातात घेतला दांडा!

मागील पंधरा दिवसांपासून येथील चिरनेर, कळंबुसरे, टाकीगाव, विंधणे, पिरकोन आदी गावांमध्ये चोरांनी अनेक घरांवर डल्ला मारून किमती ऐवज लंपास केला आहे. हे चोरटे सीसीटिव्ही कॅमेऱ्यात दिसूनही उरण पोलिसांना त्यांचा शोध घेता येत नसल्‍याचे ग्रामस्‍थांकडून आश्‍चर्य व्‍यक्‍त करण्यात येत आहे.
Published on

Uran News: उरण तालुक्याच्या पूर्व विभागात गेल्‍या काही दिवसांपासून चोरांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्‍यामुळे गावाचे संरक्षण करण्यासाठी गावोगावी तरुणांनी गस्ती पथके निर्माण केली आहेत. मात्र उरण पोलिसांकडून गस्ती पथकांना सहकार्य मिळत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

Theft
Mumbai Crime News : स्वस्त दरात प्लॅट उपलब्ध असल्याचे भासवून ग्राहकांची फसवणूक करणारा सराईत आरोपी अटक

उरण तालुक्यातील पूर्वभागातील अनेक गावे डोंगर रांगेच्या तसेच जंगल प्रदेशात वसलेली आहेत. मागील पंधरा दिवसांपासून येथील चिरनेर, कळंबुसरे, टाकीगाव, विंधणे, पिरकोन आदी गावांमध्ये चोरांनी अनेक घरांवर डल्ला मारून किमती ऐवज लंपास केला आहे. हे चोरटे सीसीटिव्ही कॅमेऱ्यात दिसूनही उरण पोलिसांना त्यांचा शोध घेता येत नसल्‍याचे ग्रामस्‍थांकडून आश्‍चर्य व्‍यक्‍त करण्यात येत आहे.

पोलिस यंत्रणा चोरट्यांचा बंदोबस्त करण्यास कूचकामी ठरत असल्याने अनेक गावांमधील तरुणांनी गस्ती पथके निर्माण करून गावोगाव जागता पहारा सुरू केला आहे. गस्‍तीदरम्‍यान गावातील तरुणांना काही संशयित व्‍यक्‍ती हाती लागले असता, पोलिसांनी चोर नसून भंगारवाले असल्‍याचे सांगून त्‍यांना सोडून देण्यात आले. अनेक गावांमध्ये भीतीचे वातावरण असताना पोलिसांकडून विशेष अशी उपाययोजना होताना दिसून येत नसल्‍याचे ग्रामस्‍थांकडून सांगण्यात येत आहे. त्‍यामुळे पोलिसांच्‍या कार्यपद्धतीवर ग्रामस्‍थांकडून संताप व्‍यक्‍त करण्यात येत आहे.

Theft
Dhule Crime News : सव्वाचार लाखांच्या दुचाकी हस्तगत; दुचाकी चोरट्यांना ट्रॅप लावून ठोकल्या बेड्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.