Bus News
Bus Newssakal

Bus News: बस चालवताना मोबाईलवर संभाषण करणाऱ्या चालकाला केले निलंबित

Published on

नेरूळ बामणडोंगरी मार्गावर बस चालवताना मोबाईलवर संभाषण करणाऱ्या चालकाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या बसवरील बस चालक महादू जठार यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती एनएमएमटीचे व्यवस्थापक योगेश कडुस्कर यांनी दिली आहे.

जठार हे एनएमएमटीच्या कायमस्वरूपी सेवेतील कर्मचारी आहेत. नेरूळ-बामणडोंगरी मार्गावर धावणारी बस मार्ग क्रमांक १७ चे चालक बस चालवताना मोबाईलवर बोलत असल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता.

Bus News
ST Bus News: ‘एमआयडीसी’च्या माध्यमातून बसस्थानकांचे रुपडे बदलणार

बस चालकाच्या या कृतीमुळे प्रवाशांच्या जिवाला धोका असल्याबाबतच्या विविध प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. तसेच प्रशासनाकडून अशा चालकांवर कारवाई होत नसल्याने अशा प्रकारची नियम मोडण्याची हिंमत होत असल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्यांमधून उमटत होती.

त्यामुळे एनएमएमटी प्रशासनाने हा विषय गांभीर्याने घेत संबंधित चालकाला कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार त्याबाबतचा खुलासाही जठार यांनी दिला होता, पण खुलासा अमान्य करत २४ तासांमध्ये चालकावर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच विभागीय चौकशी देखील प्रस्तावित आहे.

Bus News
Dhule News: धुळेकरांसाठी E Bus; मनपासाठी ‘पेट्रोलपंप’चे स्वप्न! महासभेपुढे विषय

प्रशासनाद्वारे कर्मचाऱ्यांचे कोणतेही गैरवर्तन खपवून घेतले जात नाही. तसेच संबंधितांवर तत्काळ कारवाई केली जाते. प्रवाशांची सुरक्षितता ही सदैव उपक्रमाच्या अग्रस्थानी राहिली आहे.
- योगेश कडुस्कर, व्यवस्थापक, एनएमएमटी

Bus News
Nashik Citylinc Bus News : सिटीलिंक’कडून वाहक पुरवठादार ठेकेदार कंपनीला काम सुरू करण्याचे आदेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.