Mumbai Local Crime: हार्बर रेल्वे मार्गावर चोऱ्या वाढल्या; प्रवाशांच्या सुरक्षेचं काय?

Mumbai Local Crime: हार्बर रेल्वे मार्गावर चोऱ्या वाढल्या; प्रवाशांच्या सुरक्षेचं काय?

नेरूळ रेल्वेस्थानकातून ठाणे येथे जाणाऱ्या अंकुश वीर याच्या हातातील मोबाईल खेचण्यात आला आहे, या तीनही प्रकरणाची नोंद रेल्वे पोलिसांनी केली आहे. अद्याप कोणालाही अटक नसल्याने प्रवाशांमध्ये भीती आहे.
Published on

Mumbai Local Crime: हार्बर रेल्वे मार्गावर मोबाईल खेचण्याचे प्रकार सुरूच आहेत. तीन दिवसांमध्ये दोन प्रवाशांचे महागडे मोबाईल खेचून पलायन केल्याचे प्रकार झाल्याने प्रवाशांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. रेल्वे पोलिस मात्र चोरांना पकडण्याऐेवजी फक्त चोरीचे गुन्हे दाखल करण्याचे सोपस्कर पार पाडत आहेत.

Mumbai Local Crime: हार्बर रेल्वे मार्गावर चोऱ्या वाढल्या; प्रवाशांच्या सुरक्षेचं काय?
Mumbai Local Crime: लोकलमध्ये महिला असुरक्षित? सततच्या घटनांमुळे सुरक्षा प्रश्न ऐरणीवर!

तुर्भे स्टोअर्स येथे राहणारा सूरज गुप्ता (२०) नेरूळमध्ये कुकीज डिलिव्हरीचे काम करतो. काही दिवसांपूर्वी काम संपवून रात्री सव्वा नऊच्या सुमारास तुर्भे स्टोअर्स येथील घरी जाण्यासाठी त्याने नेरूळ स्थानकातून ठाणे लोकल पकडली होती. यावेळी ठाण्याच्या दिशेने निघालेली ट्रेन फलाटावर असतानाच एका लुटारूने सूरजच्या हातातील महागडा मोबाईल खेचून पलायन केले होते. यावेळी गाडीने वेग घेतल्याने सूरजला लोकलमधून खाली उतरता आले नाही.

Mumbai Local Crime: हार्बर रेल्वे मार्गावर चोऱ्या वाढल्या; प्रवाशांच्या सुरक्षेचं काय?
Mumbai Local Crime: वाशी ते नेरुळ रेल्वे स्थानकादरम्यान एका दिवसात तीन प्रवाशांना लुटले

त्यानंतर तुर्भे सेक्टर-२२ मध्ये राहणारी पूजा शर्मा (२५) या तरुणीचा सोमवारी (ता. २९) सायंकाळी ३.३० च्या सुमारास सीवूड्स येथून सानपाड्याला जाताना पनवेल लोकलच्या जनरल डब्यात एका लुटारूने हातातील किमती मोबाईल खेचून पलायन केले होते. नेरूळ रेल्वेस्थानकातून ठाणे येथे जाणाऱ्या अंकुश वीर याच्या हातातील मोबाईल खेचण्यात आला आहे, या तीनही प्रकरणाची नोंद रेल्वे पोलिसांनी केली आहे. अद्याप कोणालाही अटक नसल्याने प्रवाशांमध्ये भीती आहे.

Mumbai Local Crime: हार्बर रेल्वे मार्गावर चोऱ्या वाढल्या; प्रवाशांच्या सुरक्षेचं काय?
Mumbai Local News: पनवेल उरण लोकलसाठी प्रवासी आग्रही; सुरु झाल्यास...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.