Mumbai Local News
Mumbai Local NewsSakal

Mumbai Local: एमयूटीपी प्रकल्पांना ७०० कोटींची तरतूद!

Provision of 700 crores for MUTP projects! केंद्र सरकारने दिलेल्या रकमेएवढी रक्कम राज्य सरकारला द्यावी लागणार आहे.
Published on

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात एमयूटीपीच्या प्रकल्पांना चालना देण्यासाठी ७८९ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. केंद्र सरकारने दिलेल्या रकमेएवढी रक्कम राज्य सरकारला आता द्यावी लागणार आहे. त्यामुळे एमयूटीपीच्या प्रकल्पाला १५७८ कोटी रुपये यंदा उपलब्ध होणार आहेत.

Mumbai Local News
Mumbai Local Crime: हार्बर रेल्वे मार्गावर चोऱ्या वाढल्या; प्रवाशांच्या सुरक्षेचं काय?

मुंबई रेल्वे विकास महामंडळातर्फे (एमआरव्हीसी) मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रकल्प (एमयूटीपी) हाती घेण्यात आले आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटच्या अर्थसंकल्पात एमयूटीपीच्या प्रकल्पांना चालना देण्यासाठी ७८९ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात एमयूटीपी २, एमयूटीपी ३ आणि ३ ए करिता निधी मंजूर केला आहे.

एमयूटीपी २ साठी १०० कोटी, एमयूटीपी ३ करता ३०० कोटी; तर एमयूटीपी ३ ए मधील प्रकल्पांसाठी ३८९ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. केंद्र सरकारने दिलेल्या रकमेएवढी रक्कम राज्य सरकारला द्यावी लागणार आहे. त्यामुळे एमयूटीपीच्या प्रकल्पाला १५७८ कोटी रुपये यंदा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पांचे काम सुरू करणे एमआरव्हीसीला शक्य होणार आहे.

Mumbai Local News
Mumbai Local News: फुकट्यांची नाकेबंदी; एका दिवसात ७४७ प्रवाशांवर कारवाई

एमआरव्हीसीला मिळालेला निधी
२०२०-२०२१ - ५५० कोटी
२०२१-२०२२ - ६५० कोटी
२०२२- २३- ५७५ कोटी
२०२३- २४ - ११०० कोटी
२०२४-२५ - ७८९


अर्थसंकल्पीय वाटपामुळे एमयूटीपीच्या कामांना आणखी चालना मिळेल. १७ स्थानकांच्या स्थानक सुधारणा कामासाठी सर्व कंत्राटे देण्यात आली आहेच. पनवेल कर्जत नवीन उपनगरीय कॉरिडॉर प्रकल्पाचे काम आणि विरार डहाणू चौपदरीकरणाचे कामही वेळापत्रकानुसार सुरू आहे. आम्ही कल्याण बदलापूर चौपदरीकरण प्रकल्प आणि बोरिवली विरार पाचच्या आणि सहाव्या लाईन प्रकल्पाचे काम सुरू केले आहे.
- सुभाष चंद गुप्ता, व्यवस्थापकीय संचालक, एमआरव्हीसी

Mumbai Local News
Mumbai Local News: पनवेल उरण लोकलसाठी प्रवासी आग्रही; सुरु झाल्यास...

एमयूटीपी २ - १०० कोटी
मुंबई सेंट्रल ते बोरिवली ६ वा मार्ग, सीएसएमटी-कुर्ला ५-६ वा मार्ग.

एमयूटीपी ३ - ३०० कोटी
विरार ते डहाणू चौपदरीकरण, पनवेल ते कर्जत दुहेरी मार्ग, ऐरोली ते कळवा लिंक रोड, ४७ वातानुकूलित लोकल गाड्या, रूळ ओलांडण्याचे प्रकार

एमयूटीपी ३ ए - ३८९ कोटी
सीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद मार्ग, २१० वातानुकूलित लोकल गाड्या, पनवेल ते विरार उपनगरीय मार्ग, सीबीटीसी नवीन सिग्नल यंत्रणा

Mumbai Local News
Mumbai Local: मुंबई लोकलचा रविवारी मेगाब्लॉक; जाणून घ्या संपूर्ण माहिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.