Kokan Railway News
Kokan Railway Newssakal

Railway News: आता कल्पवृक्षातून मध्यरेल्वे कमवणार महसूल; जाणून घ्या रेल्वेची भन्नाट कल्पना

Published on

नितीन बिनेकर : सकाळ वृत्तसेवा


Railway News: रेल्वेने प्रवास करताना तुम्हाला अनेकदा उंच उंच नारळाची झाडे नजरेत पडतात. हीच झाडे आता रेल्वेच्या महसुलात मोठी भर घालणार आहेत.

मध्य रेल्वेने रेल्वे परिसरात असलेल्या नारळ आणि ताडाची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात मध्य रेल्वे लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

Kokan Railway News
Jalgaon Railway News: भुसावळ रेल्वेने जानेवारीत मिळविला 131 कोटींचा महसूल

भारतीय रेल्वेत महसूल वाढविण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून न्यू इनोव्हेटिव्ह नॉन फेअर रेव्हेन्यू आयडीयाज ही योजना आणली आहे. या योजनेमार्फत महसूल वाढविण्यासाठी अनेक योजना राबवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यातील एक भाग म्हणून मध्य रेल्वेने आपल्या जमिनीवर असलेल्या नारळविक्रीच्या झाडांचे कंत्राट देण्याचा निर्णय घेतला आहे. यातून मध्य रेल्वेला वार्षिक लाखो रुपयांचा महसूल मिळणार आहे. तसेच नारळाच्या झाडांचे योग्यरीत्या देखभाल करता येणे शक्य होणार आहे.


सध्या मध्य रेल्वेच्या कारशेड, रेल्वे रुळाशेजारी आणि रेल्वेच्या मालकीतील अन्य रेल्वे जमिनीवर मोठ्या प्रमाणात नारळाची झाडे आहेत. झाडावरून नारळ उतरविणे गरजेचे असते, कारण नारळ न उतरवल्याची झाडांची हानी होते. त्यामुळे मध्य रेल्वेने नारळविक्रीसाठी कंत्राट देण्याचा निर्णय घेतला आहे.

Kokan Railway News
Railway Recruitment : रेल्वे भरती प्रक्रियेसाठी वार्षिक कॅलेंडर जाहीर! वर्षातून चार परीक्षा घेतल्या जाणार

सध्या झाडांची मोजणी सुरू
सध्या रेल्वे हद्दीतील नारळाच्या झाड्यांची मोजणी सुरू आहे. मोजणी पूर्ण झाल्यावर निविदा मागविण्यात येणार आहे. निविदा प्रक्रियेत जो जास्त बोली लावेल. त्यांना कंत्राट देणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’ला दिली.


हिंदूंसह आशियातील अनेक धर्मांमध्ये नारळ हे फळ पवित्र मानले जाते. नारळचा वापर पूजा आणि आरोग्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. या झाडाला इच्छापूर्तीचे झाड असेही म्हटले जाते, कारण या झाडाच्या सगळ्या भागाचा उपयोग करता येतो. त्यामुळे नारळाचा झाड्याचे स्वरक्षण करण्यासाठी रेल्वेकडूनही योजना आखली आहे.

Kokan Railway News
Konkan Railway News: कोकण रेल्वे धावणार विलंबाने; महत्वाच कारण आलं समोर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.