Mumbai News: मुली वाचवा, मुली शिकवा म्हणत केली 'गुवाहाटी ते मुंबई' सायकल स्वारी
Mumbai News: शतकमहोत्सवी वर्षानिमित्त घाटकोपरच्या श्रीमती पी. एन. दोशी महिला महाविद्यालयाच्या २१ विद्यार्थिनींनी गुवाहाटी ते गेट-वे असा सायकल प्रवास केला.
‘मुली वाचवा, मुली शिकवा’ हा संदेश देत २६ दिवसांमध्ये या विद्यार्थिनींनी तब्बल २ हजार ७५१ किलोमीटर अंतर पूर्ण केले.
तरुणींनी २१ जानेवारीला आपला प्रवास सुरू केला. गुरुवारी (ता. १५) मुंबईतील गेट-वे ऑफ इंडिया येथे या धाडसी विद्यार्थिनींचे स्वागत करण्यात आले.
एआसाम, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र अशा सहा राज्याची सफर केल्यानंतर एसएनडीटी विद्यापीठ चर्चगेटच्या प्रांगणात ढोल- ताशांच्या गजरात, विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. उज्वला चक्रदेव यांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले. ‘सायक्लोथॉन’मध्ये सहभागी झालेली विद्यार्थिनी रिया पवार म्हणाली, ‘‘या मोहिमेत अनेक चढ-उतार आले. रोजच्या सरावामुळे हा प्रवास पार करणे सहज शक्य झाले.’’
स.पी.आर.जे. कन्याशाळा ही शिक्षणसंस्था महिला शिक्षणाचे कार्य अविरत १०० वर्षे करत आहे. श्रीमती पी. एन. दोशी महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थी, शिक्षक व प्राचार्यांनी चौथे ‘सायक्लोथॉन’ आयोजित केले होते. दरवर्षी नवनवीन संकल्पनेतून महाविद्यालयाच्या वतीने मुलींसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवून जनजागृती केली जाते. यंदा ‘मुली वाचवा, मुली शिकवा’ हा संदेश या सायकल प्रवासाच्या माध्यमातून देण्यात आला.
महाविद्यालयाच्या या अनोख्या उपक्रमाचे पालकांसह सर्वच क्षेत्रातून कौतुक केले जात आहे. वरिष्ठ आणि कनिष्ठ वर्गातील या निवडक मुलींचा कसून सराव करून घेण्यात आला. मानसिक व शारीरिक तपासणी करून त्यांचे समुपदेशन देखील करण्यात आले होते.
महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. आशा मेनन , दिग्दर्शक डॉ. एस कुमुधावल्ली, संजय पाटील, शिक्षकेतर कर्मचारी जयवंत चव्हाण, विजय गुरव, गुलाब सिंह राजपूत आदींनी या ‘सायक्लोथॉन’साठी विशेष मेहनत घेतली.
या विद्यार्थिनींचा सहभाग
रितू पवार , इशिका यादव, दिव्या पांडे, रागिणी यादव , सायरा मोहमद शेख, मेहेक दामा, रिया पवार, हिरल पटेल, कीर्ती वाळुंज, कृतिका बिर्जे, फरहा खान, रिया बडवे, रोमा दुबे, अनम शेख, स्वाती गुप्ता, नेहा मौर्या, श्रुती पांडे, शहीर अन्सारी, सिया मिश्रा, सृष्टी होटा, गौरी देवेंद्र
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.