Railway News: पनवेल स्थानकातून प्रवास जिकिरीचा; कॉरिडॉरच्या कामामुळे मुख्य पूल बंद

Railway News: पनवेल स्थानकातून प्रवास जिकिरीचा; कॉरिडॉरच्या कामामुळे मुख्य पूल बंद

Published on

Panvel News: पनवेल रेल्वेस्थानकमार्गे दिल्ली-जेएनपीटी कॉरिडॉर जाणार आहे. या मार्गिकेच्या कामासाठी पनवेल स्थानकातील चार नंबर फलाटावरील पूल बंद करण्यात आला आहे.

त्यामुळे पश्चिमेकडे जाणाऱ्या प्रवाशांना अरुंद पुलावरून प्रवास करण्याची वेळ आली आहे. पण गर्दीच्या वेळेत हा प्रवास अतिशय धोकादायक असून चेंगराचेंगरीचा प्रकार घडण्याची शक्यता वाढली आहे.

Railway News: पनवेल स्थानकातून प्रवास जिकिरीचा; कॉरिडॉरच्या कामामुळे मुख्य पूल बंद
Railway News: रेल्वेच्या व्हिस्टाडोम कोच सुसाट; दीड लाख पर्यटकांचा प्रवास

पनवेल रेल्वेस्थानकात दोन पूल आहेत. एक पूल हा फलाट क्रमांक पाचवरून सहा, सातवर जाण्यासाठी वापरला जातो, तर एक पूल हा नवीन पनवेलला जोडलेला आहे.

पुलाखालून दिल्ली-जेएनपीटी कॉरिडॉर पनवेल रेल्वे स्टेशन जात आहे. त्यामुळे पनवेल रेल्वेस्थानकामध्ये फलाट क्रमांक चारवर कॉरिडॉरसाठी नवीन पटरीचे काम सुरू आहे.

रेल्वेस्थानकातील सध्याचा पाच नंबरच्या फलाटापासून लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या तिकीट खिडकी येथून पुढे पोलिस स्टेशनवरून हा मार्ग जेएनपीटीकडे जात आहे. या मार्गाचे काम सुरू असताना डबलडेकर मालवाहतूक होणार असल्याकारणाने या ठिकाणी पुलाची उंची वाढवण्यात येणार आहे.

त्यामुळे पनवेल रेल्वेस्थानकातील प्रवाशांसाठीचा पूल बंद करण्यात आला आहे, पण पनवेल रेल्वेस्थानकात लोकल तसेच लांब पल्ल्याची गाड्या एकाच वेळी येत असल्याने दोन्ही गाड्यांमधून उतरलेल्या प्रवाशांमुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. पनवेल रेल्वेस्थानकात ही बाब नित्याची झाली असून प्रवाशांना मनस्ताप होत आहे.

Railway News: पनवेल स्थानकातून प्रवास जिकिरीचा; कॉरिडॉरच्या कामामुळे मुख्य पूल बंद
Railway Crime: आरपीएफकडून चोरट्यांची धरपकड; तीन दिवसात ५ चोरट्यांना अटक!

चेंगराचेंगरी होण्याची शक्यता


- पनवेल रेल्वेस्थानकामध्ये लोकल तसेच लांब पल्ल्याच्या फलाटांवर जाण्यासाठी हा एकच मार्ग आहे. अशातच कॉरिडॉरसाठीच्या डबल डेकरमुळे पुलाची उंची आणखी पाच ते सात फूट वाढणार आहे. त्यामुळे वयोवृद्ध, लहान मुले, रुग्ण व गरोदर स्त्रियांचे हाल होणार आहेत.


- दिल्ली कॉरिडॉरचे काम सुरू करणाऱ्या ठेकेदाराने या ठिकाणी पर्यायी पुलाची व्यवस्था करणे क्रमप्राप्त होते; परंतु तसे झालेले नाही. त्यामुळे पूर्व-पश्चिमेला जोडणारा एकमेव पूल हाच प्रवाशांसाठीचा मार्ग शिल्लक आहे. हा पूल अरुंद असल्याने एकाच वेळी होणाऱ्या गर्दीमुळे भविष्यात हा प्रकार मोठ्या दुर्घटनेला निमित्त ठरण्याची शक्यता आहे.

प्रवासी संघटनांचे त्रुटींवर बोट


पनवेल रेल्वेस्थानक हे भविष्यात मोठे जंक्शन होणार आहे. या ठिकाणी हार्बरचे अवघे तीन, तर लांब पल्ल्याच्या मेलसाठीचे तीन फलाट आहेत. रेल्वेस्थानकात दोन पूल आहेत. एक पूल पाच नंबरवरून सहा व सात नंबरला जातो. या ठिकाणी लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या तिकीट काढण्याची खिडकी आहे, तर दुसरा पूल हार्बरच्या चार नंबरपासून सुरू होऊन पूर्वेला जाणाऱ्या पुलाला जोडला आहे. त्यामुळे पनवेल रेल्वेस्थानकात पूर्व-पश्चिम जाण्यासाठी दोन पूल असावेत, अशी मागणी प्रवासी संघटनांची आहे.

Railway News: पनवेल स्थानकातून प्रवास जिकिरीचा; कॉरिडॉरच्या कामामुळे मुख्य पूल बंद
Railway Crime: रेल्वेत नोकरी लावण्याच्या बहाण्याने जळगावच्या तरुणाची मुंबईत फसवणूक

पनवेल पूर्व पश्चिम जाण्यासाठी एकच अरुंद पूल आहे. रेल्वे प्रशासनाने प्रथम पर्यायी पूल बांधून नंतर प्लॅटफॉर्म वाढवणे तसेच कॉरिडॉरचे काम हाती घेतले पाहिजे होते. दोन गाड्या एकत्र आल्यानंतर या पुलावरून चालणे कठीण होते.


- विशाखा सावंत, रेल्वे प्रवासी

आधीच उंच असलेल्या लोकल फलाटावरून पूर्वेकडे जाणाऱ्या पुलाची उंची वाढवली जाणार आहे. त्याची उंची आणखी वाढवल्याने माझ्यासारख्या वृद्धाची गैरसोय होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी रेल्वे प्रशासनाने लिफ्ट बसवावी.


- रमाकांत परदेशी, रेल्वे प्रवासी

Railway News: पनवेल स्थानकातून प्रवास जिकिरीचा; कॉरिडॉरच्या कामामुळे मुख्य पूल बंद
Nagpur Railway Station: नागपूर रेल्वेस्थानकाचा चेहरामोहरा बदलणार, वारसा व आधुनिकतेचे असणार मिश्रण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.