naresh mhaske aditya thakre
naresh mhaske aditya thakre sakal

Thane Politics: आधी घर सांभाळा, मग आव्हान द्या ; नरेश म्हस्के यांचा आदित्य ठाकरेंना टोला

या वेळी आदित्य ठाकरे यांनी पुन्हा शिंदे यांना राजीनामा देऊन आपल्याविरोधात निवडणूक लढण्याचे आव्‍हान दिले. त्याचा शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी समाचार घेतला
Published on

Thane Politics: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी रविवारी ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली.

या वेळी आदित्य ठाकरे यांनी पुन्हा शिंदे यांना राजीनामा देऊन आपल्याविरोधात निवडणूक लढण्याचे आव्‍हान दिले. त्याचा शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी समाचार घेतला.(aditya thackeray thane)

naresh mhaske aditya thakre
Thane News: पुस्तकी अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांनी विविध कला, छंद जोपासावेत

‘तुमच्या पक्षाची आधीच वाताहत झाली आहे. जे शिल्लक आहेत तेही जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे आधी घर सांभाळा, मग आव्‍हान द्या’, असा टोला म्हस्के यांनी लगावला.


म्हस्के म्हणाले की, ठाण्यात येऊन केवळ नक्कल करण्यापलीकडे त्यांनी काहीच केले नाही. तो एक कॉमेडी शो होता. यापुढे त्यांना हेच काम करावे लागणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर बोलण्याइतके आपण मोठे झालेला नाहीत. आधी पुरुषांच्या आवाजात बोला, नंतर आव्हान द्या.(shinde vs thackeray)

naresh mhaske aditya thakre
Thane News: मुंब्रा विभागातील ३९ जणांची तडकाफडकी बदली

तुम्हाला खासदार शिंदे यांनी कल्याणमध्ये आव्हान दिले आहे. ते स्वीकारा. ते स्वत: ज्या ठिकाणी राहतात, तो मतदारसंघ सोडून वरळीच्या सुरक्षित मतदारसंघाची निवड केली.

आता पुन्हा सुरक्षित मतदारसंघ शोधत असल्याचीही टीका केली. म्हस्के यांचे तिकीट शिंदे यांनीच कापल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली. त्यावर म्हस्के म्हणाले की, आमच्यात भांडणे लावू नका. पदासाठी शिंदेंसोबत गेलेलो नाही.

शिवसैनिकांच्या मागे उभा राहणारा आणि बाळासाहेबांचे विचार अंगीकारलेला माणूस म्हणून शिंदे यांच्यासोबत आम्ही आहोत.

naresh mhaske aditya thakre
Thane News: पुस्तकी अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांनी विविध कला, छंद जोपासावेत

आनंद दिघे यांचा हा इलाका!


‘इलाका हमारा, धमाकाभी हमारा होगा’ असे म्हणणाऱ्यांनी आधी ठाण्यात किती लोक तुमच्याबरोबर आहेत, याचे आत्मपरीक्षण करावे. हा तुमचा नाही, तर धर्मवीर आनंद दिघे यांचा इलाका आहे, असे नरेश म्हस्के यांनी आदित्य ठाकरे यांना सुनावले.

naresh mhaske aditya thakre
Thane Encroachment : अनाधिकृत बांधकामांवरील कारवाईला महिलांचा विरोध; पालिकेने दिली दोन दिवसांची मुदत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.