Dahanu-Virar  Loal
Dahanu-Virar Loal sakal

Railway News: डहाणू - विरार रेल्वेच्या चौपदरीकरणास नकार; प्रवाशांमध्ये नाराजी

तसेच डहाणू-विरार रेल्वेचे चौपदरीकरण झाल्यानंतर अतिरिक्त डहाणू लोकल सुरू करण्यात येईल, असे सांगितले
Published on

Railway News: डहाणू उपनगरीय रेल्वे सेवा वाढवण्याची मागणी पश्‍चिम रेल्वेच्या क्षेत्रीय रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीत सदानंद पावगी यांनी केली होती.

मात्र, डहाणू विरार रेल्वेचे चौपदरीकरण झाल्यानंतर अतिरिक्त डहाणू लोकल सुरू करण्यात येईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.(mumbai Local Latast News)

Dahanu-Virar  Loal
Pune Division Railway : पुणे विभागात आणखी २४ रेल्वे स्थानके ; दौंड-अंकाईपर्यंतचा मार्ग पुणे विभागात समाविष्ट

पश्चिम रेल्वेच्या क्षेत्रीय रेल्वे सल्लागार समितीची बैठक १६ फेब्रुवारीला मुंबई सेंट्रल येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत समितीचे सदस्य सदानंद पावगी यांनी डहाणू उपनगरीय सेवा वाढवण्याची मागणी केली होती.

मात्र रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी डहाणू लोकलबाबतीत तांत्रिक अडचणी सांगितल्या. तसेच डहाणू-विरार रेल्वेचे चौपदरीकरण झाल्यानंतर अतिरिक्त डहाणू लोकल सुरू करण्यात येईल, असे सांगितले.(why dahanu virar local is importat)

Dahanu-Virar  Loal
Railway News: रेल्वेच्या व्हिस्टाडोम कोच सुसाट; दीड लाख पर्यटकांचा प्रवास


त्याचप्रमाणे सकाळी ७ वाजताची डहाणू-विरार लोकल पुन्हा सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावर असा प्रस्ताव बोर्डाकडे पाठवला असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून लेखी उत्तर देण्यात आले.

सौराष्ट्र एक्स्प्रेसच्या वेळेत बोरिवली येथून डहाणू लोकल सोडण्याची मागणीही या बैठकीत करण्यात आली. त्यावर बोरिवली येथून चर्चगेट- विरार लोकल धावत असल्याने प्रवाशांनी विरार येथून सकाळी १०.०७ वाजताची डहाणू लोकल पकडावी, असा सल्ला रेल्वे प्रशासनाने दिल्याचे सांगितले जात आहे. सकाळी १०.१० ते १०.३५ च्या दरम्यान डहाणू येथून अतिरिक्त डहाणू-विरार लोकल सुरू करावी, या मागणीलासुद्धा रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवल्याचे पावगी यांनी सांगितले. Dahanu-Virar local Latest News

Dahanu-Virar  Loal
Railway News: आता कोकण मार्गावर अनारक्षित मेमू!

पालघर हे जिल्हा मुख्यालय असूनही सोळा वर्षांपासून दुर्लक्षित आहे. फार कमी लांब पल्ल्याच्या गाड्यांना इथे थांबे मिळाले आहेत. त्यामुळे वाढते नागरीकरण औद्योगीकरण लक्षात घेऊन लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबे देण्यात यावेत, यावर रेल्वे अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.
- सदानंद पावगी, सदस्य रेल्वे सल्लागार समिती (mumbai News)

Dahanu-Virar  Loal
Railway News: आपण काही रेल्वेचे जवाई नाही,फुकट्यांना मराठमोळा डोस!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.