Effect Of  Pollution On Dogs
Effect Of Pollution On Dogssakal

Effect Of Pollution On Dogs: प्रदूषणामुळे कुत्र्यांचे आयुष्य चार वर्षांनी घटले; रिसर्चमध्ये बाब आली आहे.

आरोग्याला धोका पोहोचवणारे वायुप्रदूषण असल्याचे मायवेट्स चॅरिटेबल ट्रस्ट अँड रिसर्च सेंटरच्या सर्वेक्षणात आढळून आले आहे
Published on

राजीव डाके


Thane News: ध्वनी आणि वायुप्रदूषण ही जागतिक समस्या बनली आहे. या समस्येने जसे मानवाला ग्रासले, त्याच पद्धतीने प्राणी-पक्ष्यांनाही त्याचा विळखा बसला आहे. महामार्गाच्या परिसरात आढळणाऱ्या प्राणी आणि पक्ष्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्थमा आणि फुफ्फुसे काळे पडण्याचे आजार आढळून आले आहेत. तसेच परिसरातील कुत्र्यांचे आयुष्य तीन ते चार वर्षांनी घटल्याची बाब एका रिसर्चमध्ये समोर आली आहे.

Effect Of  Pollution On Dogs
Pune Water Pollution: नद्या वाचवण्यासाठी हे आजोबा करत आहेत हात जोडून विनंती

सध्या पहाटेच्या सुमारास वातावरणात गारवा असतो. सकाळी धुके पसरलेले असते. धुक्याचा आनंद घेण्यासाठी शहरातील लोक सकाळी लवकर घराबाहेर पडतात. अशा वेळी अनेक जण पाळीव कुत्र्यांना सोबत घेतात.

मात्र, धुके समजून सकाळी लवकर घराबाहेर पडलेली ही मंडळी स्वतः सोबतच आपल्या पाळीव प्राण्यांचेही आरोग्य धोक्यात घालत आहेत. हवामान तज्‍ज्ञांच्या मतानुसार पहाटे जे धुके पसरलेले असते, ते आरोग्याला धोका पोहोचवणारे वायुप्रदूषण असल्याचे मायवेट्स चॅरिटेबल ट्रस्ट अँड रिसर्च सेंटरच्या सर्वेक्षणात आढळून आले आहे.(Air Pollution and Domestic Animals)

Effect Of  Pollution On Dogs
Air Pollution : उत्तरेत हवेचा दर्जा सुधारला तर दक्षिणेत घसरला; ला निनाचा परिणाम

वायुत मिसळलेले कार्बनचे घटक फुफ्फुसाला बाधा पोहचवतात. त्यामुळे फुफ्फुसे निकामी होण्याचा धोका अनेक पटीने वाढतो. याबाबत मुंबईमध्ये झालेल्या एका मृत भटक्या कुत्र्याचे शवविच्छेदन नुकतेच करण्यात आले होते. त्यावेळी त्याचे फुफ्फुस कार्बनमुळे काळे पडून निकामी झाल्याचे आढळले. त्यात त्याचा मृत्यू झाला.

ठाणे-मुंबई महामार्ग परिसरात आढळून येणाऱ्या पाळीव आणि भटक्या कुत्र्यांनाही हा धोका आहे. महामार्ग आणि ज्या ठिकाणी वाहनांची वाहतूक होते, अशा ठिकाणी आढळणाऱ्या कुत्र्यांचे आयुर्मान तीन ते चार वर्षांनी घटल्याचे मायवेट्स चॅरिटेबल ट्रस्ट अँड रिसर्च सेंटरचे सचिव डॉ. युवराज कागिनकर यांनी सांगितले.

Effect Of  Pollution On Dogs
Pune Air Pollution : प्रदूषित हवेपासून घ्या काळजी; गुणवत्ता ढासळली; रुग्णांनी विशेष खबरदारी घेणे गरजेचे

आढळणारे आजार


वायुप्रदूषणामुळे कुत्र्यांमध्ये अस्थमा, लकवा, निमोनिया, श्वसन आणि फुफ्फुसाचे घातक आजार आढळून येत आहेत. मिरा-भाईंदर शहरांच्या थोडे पुढे गेले, तर तेथील भटक्या कुत्र्यांचे आयुर्मान १३, १४ वर्षांचे आढळून येते. परंतु ठाणे, मुंबई शहरातील भटक्या कुत्र्यांचे आयुर्मान मात्र अवघे आठ ते नऊ वर्षांपर्यंत आढळून येते.

हवेतील कार्बनमुळे श्वसनाचे आणि निमोनियासारखे फुफ्फुसाचे आजार होऊ शकतात. पालकांनी त्यांच्या पाळीव प्राणी, पक्ष्यांना सूर्य उगवल्यानंतर घराच्या बाहेर फिरायला घेऊन जायला हवे. कारण उन्हामुळे वातावरणातील कार्बनयुक्त फॉग वर निघून जातो. त्यामुळे वातावरण काहीसे शुद्ध होण्यास मदत होते. पाळीव प्राण्यांबाबत अशी काळजी घेतली जाऊ शकते; पण महामार्ग, सिग्नल, वाहतुकीच्या चौकालगत आढळणाऱ्या भटक्या कुत्र्यांचीही काळजी घेणे गरजेचे आहे.


- डॉ. युवराज कागिनकर, ज्येष्ठ पशुवैद्यकिय, सचिव, मायवेट्स चॅरिटेबल ट्रस्ट अँड रिसर्च सेंटर

Effect Of  Pollution On Dogs
Pollution: नवी मुंबईच्या हावेचा दर्जा खालावला; नागरीकांना होत श्वसनाचा त्रास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.