crime news
crime news sakal

Crime News: बांधकाम व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकाविणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा

कोरोनामुळे काम बंद झाल्याने त्याने बांधकामाचा व्यवसाय सुरू केला होता | Crime News: Crime against three for extorting a builder
Published on

Mumbai : बांधकाम व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकाविणाऱ्या तिघांविरुद्ध मालवणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. झाकीर हुसैन सय्यद ऊर्फ झाकीर डॉट कॉम, आमीरअली झाकीर सय्यद, उमेद झाकीर सय्यद अशी या तिघांची नावे आहेत.

crime news
Mumbai News : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमुळे बौद्ध‍िक संपदेचे कार्यक्षेत्र अमर्याद असेल

यातील तक्रारदार त्याच्या कुटुंबीयांसोबत मालवणी परिसरात राहतात. पूर्वी तो रिक्षाचालक म्हणून काम करत होता. मात्र कोरोनामुळे काम बंद झाल्याने त्याने बांधकामाचा व्यवसाय सुरू केला होता.

याचदरम्यान त्याला झाकीरसह त्याच्या दोन मुलांकडून सतत खंडणीसाठी धमकी येत होती. व्यवसाय वाढत असल्याने, तसेच त्यांची प्रचंड दहशत असल्याने त्याने त्यांना ऑनलाईन खंडणीची रक्कम देण्यास सुरुवात केली होती.

crime news
Mumbai News: अटल सेतू नंतर आता होणार या सागरी सेतूचं लवकरच होणार उद्घाटन; पायलिंगचे काम झाले सुरू

जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत त्याने खंडणी स्वरूपात अकरा लाख चौदा हजार रुपये पाठविले होते. तरीही ते तिघेही सतत त्याला खंडणीसाठी धमकी देत होते. त्यामुळे त्या व्यावसायिकाने मालवणी पोलिसांत तक्रार केली होती.

crime news
Mumbai News: डेंग्‍यूचा डास आढळल्‍यास मनपा करणार कडक कारवाई!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()